'विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष द्या'

'विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष द्या'

करंजगाव । वार्ताहर | Karanjgaon

जि.प. च्या ग्रामीण भागातील (rural area) शाळेच्या (school) विद्यार्थ्यांना (students) शैक्षणिक स्पर्धेत (Educational competitions) टिकण्यासाठी विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे. शालेय शिक्षकांनी (teachers) विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष द्यावे असे प्रतिपादन निफाड पं.स. चे माजी सभापती शहाजी राजोळे यांनी केले आहे.

करंजगाव (Karanjgaon) येथे जि.प. च्या प्राथमिक शाळेत (ZP Elementary School) शाळापूर्व तयारी पालक मेळाव्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून राजोळे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच प्रज्ञा नंदू निरभवणे, उपसरपंच वर्षा किरण जाधव, गटनेते रावसाहेब राजोळे, माजी सरपंच खंडू बोडके, शिवसेनेचे गटप्रमुख सागर जाधव, ग्रा.पं. सदस्य नामदेव पवार, रोहिदास कामडे, वासुदेव जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश गांगुर्डे, उपाध्यक्ष योगेश राजोळे, सदस्य योगेश बोर्‍हाडे, राजेंद्र राजोळे, अनिल जोगदंड, नरहरी निरभवणे, शंकर पवार, योगेश वल्टे, शशिकांत राजोळे, छोटू डांगळे उपस्थित होते.

यावेळी अतिथींच्या हस्ते प्रतिमापूजन करून विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. शिक्षक प्रभाकर राठोड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार (Ideal Teacher Award) मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या डिजिटल वर्गासाठी (Digital class) खंडू बोडके यांनी 2100 रु. देणगी दिली. शिक्षक प्रभाकर राठोड व कल्पना बावकर यांनी शाळेच्या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी शहाजी राजोळे, सागर जाधव, खंडू बोडके, योगेश राजोळे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.

मेळाव्यास माजी सरपंच खंडू बोडके, ज्ञानेश्वर रोडे, शालेय समिती सदस्य योगेश चव्हाण, राजेंद्र वल्टे, शरद गोतीस, योगेश पीठे, संदीप पीठे, सागर राजोळे, हेमंत दिघे, मुख्याध्यापिका श्रीमती. अरुणा चव्हाण, डोंगरे, श्रीमती. गोसावी, गांगोडे, श्रीमती. वाघले, प्रभाकर राठोड, कल्पना बावकार, रवींद्र पवार, युवराज कोटकर, देविदास मोरे, रामदास कोटकर, मुरली जोगदंड, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रभाकर राठोड यांनी केले. प्रास्ताविक योगेश राजोळे यांनी केले तर योगेश बोराडे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.