खते, कृषी निविष्ठेवर १६ भरारी पथकांची नजर
खते

खते, कृषी निविष्ठेवर १६ भरारी पथकांची नजर

- जिल्हा कृषी अधिकारी रमेश शिंदे

नाशिक । Nashik

जिल्हयातील शेतकऱ्यांना गुणवत्तापुर्ण दर्जेदार, योग्य किंमतीत व वेळेत कृषि निविष्ठा मिळण्याकरीता त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर १५ अशी १६ भरारी पथके स्थापन केले आहे.

ही भरारी पथके कोणत्याही वेळी खत विक्रेत्यांची पाहणी करतील, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी रमेश शिंदे यांनी सांगितले.

तालुकास्तरावरील भरारी पथकामध्ये तालुका कृषि अधिकारी हे अध्यदा म्हणुन कामकाज पाहतील. तसेच कृषी अधिकारी पंचायत समिती,निरीक्षक वजने मापे, मंडळ कृषि अधिकारी हे सदस्य व कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालय हे सचिव म्हणुन कामकाज करतील.

या अनुषंगाने जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. खतांच्या गोणीवरील छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री करणे हा गुन्हा आहे. जादा दराने खतांची विक्री होत असल्याचे आढळुन आल्यास तात्काळ तालुकास्तारवरील भरारी पथकाने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

शेतकºयांनी परवानाधारक कृषि निविष्ठा अनुदानित रासायनिक खतांची खरेदी ही ई-पॉस मशिनव्दारेच करावी. जेणेकरून अवैधरीत्या विक्री होणाºया कृषि निविष्ठांची खरेदी टळेल असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी शिंदे यांनी केले.

सद्यस्थितीत रासायनिक खतांच्या काही ग्रेडच्या किंमती वाढल्या असल्या तरी जुन्या दरांची खते त्याच दरात शेतकºयांना विक्री करणे, कृषि निविष्ठा विक्रेत्यांना बंधनकारक असुन तसे निर्देश सर्व कृषि निविष्ठा विक्रेत्यांना देण्यात आलले आहे.

सर्व विक्रेत्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जुन्या दराचा व नविन दराचा साठा भावफलकावर स्वतंत्रपणे नोंद घेणे व अदयावत करणे आवश्यक आहे अशा सूचना ही देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com