उड्डाणपूल रद्द; मनसेनेचा जल्लोष

उड्डाणपूल रद्द; मनसेनेचा जल्लोष

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

नाशिक महानगरपालिकेतर्फे शहरातील संभाजी चौक, सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक असा प्रस्तावित उड्डाणपुलाला ( Proposed Fly over From city Center Mall To Trimurti Chowk ) स्थगिती मिळाल्याने मनसेनेनेे ( MNS ) दिलेल्या लढ्याच्या यशाचा जल्लोष त्रिमूर्ती चौक येथे पेढे वाटप करून साजरा केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शहरातील संभाजी चौक, सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक या दरम्यान होणार्‍या उड्डाणपुलाला विरोध दर्शविला होता. सदरहू पूल उभारणीच्या कामाला मनसेना शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती

. दरम्यान मायको सर्कल पाठोपाठ त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपूलांची गरज नसल्याच्या आयआयटी पवईच्या अहवाला नंतर तत्कालीन मनपा आयुक्त रमेश पवार यांनी दोन्ही उड्डाणपूल रद्द करण्याचे आदेश दिले. यावेळी मनसैनिकांतर्फे त्रिमूर्ती चौक येथे पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर, उपजिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, नवीन नाशिक विभाग अध्यक्ष नितीन माळी, बबन जगताप , महिला सेनेच्या कामिनी दोंदे,अरुणा पाटील, निर्मला पवार,भाग्यश्री ओझा, गौतम पराडे,सचिन कामानकर , सचिन रोजेकर, राहुल पाटील, मनोज जैन, अजिंक्य शिर्के, पंकज दातीर, गोपी पगार, गोपी गांगुर्डे, शुभम थोरात, सचिन ओझा, समाधान चव्हाण, गणेश दातीर, पदाधिकारी, भाजी विक्रेते, व्यावसायिक व मनसैनिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com