फुले
फुले
नाशिक

देऊळबंदमुळे गुलशनाबादमध्ये फुले कोमजली

देऊळ बंद : शेतकरी व विक्रेते संकटात

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

गुलशनाबाद ही नाशिकची ओळख असून देशातच नव्हे तर विदेशातही येथील फुलांचा सुगंध दरवळतो. येथील गुलाब, मोगरा,शेवंतीला मंदिरामधुन मोठी मागणी असते. पण करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता मंदिरे बंद असून धार्मिक सोहळ्यावर देखील गंडांतर आले आहे. त्यामुळे श्रावणातही फुलांचा बाजार कोमजल्याचे पहायला मिळत आहे. फुल उत्पादक शेतकर्‍यांसोबतच विक्रेते आर्थिक अडचणीत ‍आले आहेत. फुलांना मागणी नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. फुलांच्या माध्यमातून होणारी कोट्यवधीची उलाढाल थंडावली आहे.

करोना संकटाचे दुष्परिणाम सर्वच क्षेत्रावर पहायला मिळत असून फुल शेती देखील त्यास अपवाद नाही. भाव मिळत नसल्यामुळे अनेकांनी फुलांची बागावर कुऱ्हाड चालवली आहे. झेंडू, गुलाब, मोगरासह सर्वच फुलांची मागणी कमी झाली आहे. श्रावण महिन्यातील देशभरात नाशिकचे फुले पाठवली जातात. त्यातून लाखोंची उलाढाल होते. पण यंदा करोनामुळे ही उलाढाल ठप्प झाली आहे. देशभरात मागील 22 मार्चला लाॅकडाउन जारि करुन तो पाच टप्प्यांमधे वाढविण्यात आला. त्यानंतर सरकारने मे महिन्याच्या अखेरीस लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली. त्यामुळे उद्योग -व्यवसायांना प्रारंभ करण्यात आला. परंतु अद्यापही मंदिर, मश्‍जिद, गुरूद्वारा, चर्चसह सर्वच प्रार्थनास्ळे बंद असून सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाही.

विवाह सोहळ्याला 50 तर अत्यंविधीला 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे फुलांनी मागणी केवळ 10 ते 15 टक्क्यांवर आली आहेत. तर गतवर्षीपेक्षा बाजार भाव निम्म्यांपेक्षा देखील कमी झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील फुल उत्पादकांना कोट्यवधी रूपयांचा फटका बसला आहे. तर विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता प्रार्थनास्थळे केव्हा उघडतात, याकडे सर्वाचेच लक्ष लागुन राहीले आहे.

फुलबाजार सुनासुना

नाशिकचा फुल बाजार हा प्रसिध्द आहे. येथे फुल विक्रिसाठी मोठया संख्येने विक्रेते येतात. पहाटे पाच ते दुपारी १२ या वेळेत हा परिसर नानाविविध फुलांच्या सुंगधाने दरवळतो. रोज लाखोंची उलाढाल होते. पण मागील काही दिवसांपासून करोनामुळे येथील चैतन्य हरवल्याचे पहायला मिळते. येथील फुल विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

करोनामुळे मंदिरे बंद आहेत. त्यामुळे फुलांचा खप खालावला आहे. विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

- सविता माळी, फुल विक्रेत्या

Deshdoot
www.deshdoot.com