समन्वयातून पूरपरिस्थिती हाताळा - छगन भुजबळ

समन्वयातून पूरपरिस्थिती हाताळा - छगन भुजबळ

नाशिक । Nashik

जिल्ह्यात पावसाची (Rain) संततधार सुरु असल्याने धरणसाठ्यात (Dam) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबत दर तासाला आढावा घेऊन नागरिकांना पुराची (Flood) भीषणता जाणवणार नाही यासाठी टप्याटप्प्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात यावा. यासाठी जिल्हा प्रशासन (District Administration) पोलीस प्रशासन (Police Administration) आणि जलसंपदा विभाग (Department of Water Resources) यांनी समन्वय ठेवून पूरपरीस्थीती हाताळावी अशा सूचना माजी मंत्री आ. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Collector Gangatharan d) यांना केल्या आहेत...

नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून शहर व जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरीसह (Godavari River) जिल्ह्यातील नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी आज नाशिक गोदावरीच्या पूरपरिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांची भेट घेऊन चर्चा केर्ली.

यावेळी ते म्हणाले की, पुराची भीषणता जाणवणार नाही यासाठी टप्याटप्याने पाण्याचा (water) विसर्ग करण्यात यावा. गोदावरी नदीत निर्माण झालेल्या पानवेलींमुळे निफाड तालुक्यातील (Niphad taluka) बंधाऱ्याना धोका निर्माण होत असून त्या तातडीने हटविण्यात याव्यात. नाशिक शहरातील धोकादायक वाड्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासोबतच पडलेल्या वाड्यांचे तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्यात यावा. तसेच लासलगाव-विंचूरसह १६ गावे पाणीपुरवठा योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी नांदूरमध्यमेश्वर धरणाचे (Nandur Madhyameshwar Dam) एक गेट बंद करण्यात यावे असेही त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, निफाड तालुक्यातील देवगाव (Devgaon) येथील कॅनॉल शेजारी सुमारे १५०० एकर क्षेत्रात पाणी साचले आहे. याठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी चर काढण्यात यावा. येवला तालुक्यात (Yeola taluk) पावसाचे प्रमाण कमी असल्याने पालखेड डावा (Palkhed Dam) कालव्याच्या पाण्याने येवल्यातील बंधारे भरून द्यावे. त्याची सुरुवात ४६ ते ५२ पासून सुरुवात करण्यात यावी. चांदवड तालुक्यातील (Chandwad taluka) केद्राई धरण भरल्याने केद्राईचे पाणी आजपासून दरसवाडी मध्ये सोडावे. त्यामुळे मांजरपाडयाचे येणारे पाणी पुढे दरसवाडी कालव्याच्या माध्यमातून पाणी प्रवाहित होऊन डोंगरगाव पर्यंत पोहोचणार आहे. तसेच जीवितहानी टाळण्यासाठी पूरपरीस्थिती पाहण्यासाठी गर्दी करणार्‍या तसेच धोकेदायक पुलांवरून जाणार्‍या नागरिकांना आळा घालण्यासाठी पोलीस बंदोबस्त (Police arrangements) देण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी केल्या.

दरम्यान, यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पगार, नाशिक मनपाचे माजी गटनेते गजानन शेलार, काँग्रेसच्या नगरसेविका वत्सला खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, शहर सरचिटणीस संजय खैरनार, नाना पवार, रवी हिरवे, अ‍ॅड.चिन्मय गाढे, रामेश्वर साबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com