येवला - कोळगंगा नदीला पूर

कोंबडवाडीत शिरले पाणी
येवला - कोळगंगा नदीला पूर

येवला l प्रतिनिधी

येवला तालुक्यातील अंदरसुल परिसरात झालेल्या जोरदार पावसाने गोळगंगा नदीच्या पात्रात अचानक रात्री १० वाजेच्या सुमारास नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बोकटे येथे कोळगंगा नदीला पूर आला.

गावातीलच आदिवासी वस्तीत लोक रात्रीच्या वेळी झोपेत असतांना अंधारात गोरगरिबांच्या कोंबडवाडी या वस्तीत पुराचे पाणी शिरले.

यामुळे बोकटे ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण बोकटे गाव हे कोळगंगा नदीलगत असून त्या ठिकाणी नदीच्या पात्रात जिल्हापरिषद अंतर्गत चुकीच्या ठिकाणी काँग्रेट बंधारा बांधलेला आहे.

नंतर त्याची उंची वाढवली आहे. आणि तरीही त्याच्या पेक्षा अधिक जास्त उंच ग्रामपंचायतीने युवा मित्राच्या मदतीने मोठा वाळू मिश्रीत मातीचा बंधारा घातला आहे.

त्यामुळे वाढलेले नदीच्या पात्रातील पाण्याचा खूपच मोठा प्रवाह अडला असून त्या अडलेल्या पाण्याचा पूर्ण तुंब हा गावातील आदिवासी वस्तीत घुसून रात्रीच्या वेळी गाढ झोपलेल्या गोरगरीब मजूरांच्या जीवावर बेतला आहे.

तसेच या मातीच्या बंधाऱ्याचा सांडीचा प्रवाह गावाच्या विरुद्ध दिशेने असलेल्या प्रवाहाच्या दुसऱ्या बाजूला असलेली जमिन वाचवण्यासाठी त्या बंधाऱ्याची सांड गावाच्या दिशेने पी.डब्ल्यू.डी.च्या साईट गटारातून काढली आहे.

त्यामुळे बोकटे गावाचा महत्वाचा अंदरसुल बोकटे रस्ता पुराच्या आणि सतत वाहणाऱ्या नदीच्या पात्रातील पाण्याच्या तीव्र गातीने खचला आहे.

बोकटे गावाला भविष्यात या मातीच्या बंधाऱ्यामुळे पूर्ण गावात पाणी घुसून खूप मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच यावर उपाय योजना करणे हा खूप मोठा चिंतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पुराच्या पाण्याने बोकटे येथील ग्रामस्तांचे खूप नुकसान झाले आहे.

या साठी बोकटे येथील ग्रामस्थांनी सदर प्रसंग परत ओढून आल्यास उपाय योजना करण्यासाठी येवला तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com