चिंचखेड सहकारी सोसायटी वर क्रांती पॅनलचा झेंडा

तरुणांना संधी; जनतेने ज्येष्ठांना डावलले
चिंचखेड सहकारी सोसायटी वर क्रांती पॅनलचा झेंडा

चिंचखेड | तुषार झेंडफळे | Chinchkhed

दिंडोरी तालुक्यातील (dindori) चिंचखेड (chinchkhed) येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची (Executive Cooperative Society) निवडणूक (election) प्रक्रिया रविवारी नुकतीच पार पडली. 13 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया (Election process) शांततेच्या वातावरणात पार पडली.

जनसेवा पॅनल (janseva Panal) आणि क्रांती पॅनल (kranti Panal) हे दोन पॅनल निवडणुकीच्या आखाड्यात होते. दोन्ही पॅनल मिळून 26 उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते त्यापैकी 13 जागांसाठी मतदान पार पडले. क्रांती पॅनल ने अकरा जागांवर बहुमत सिद्ध करून विजय मिळविला. तर जनसेवा पॅनलला दोन जागांवर विजय मिळविता आला. क्रांती पॅनल मध्ये जनतेने युवापिढीला (Youth) पसंती दिली असून ज्येष्ठांकडे मात्र जनतेने पाठ फिरविल्याचे चित्र बघावयास मिळाले.

क्रांती पॅनल चे नेतृत्व विठ्ठलराव संधान, निवृत्ती मातेरे माणिक संधान संदीप जगताप, शिवानंद संधान,अरुण पाटील, सोमनाथ मातेरे, आदींनी केले तर जनसेवा पॅनल चे नेतृत्व कादवा चे संचालक त्र्यंबकराव संधान, खंडेराव संधान,प्रभाकर पाटील यांनी केले. क्रांती पॅनलच्या उमेदवारांनी परिवर्तन घडवून आणले चिंचखेड सहकारी सोसायटीवर विठ्ठलराव संधान,प्रा संदीप जगताप यांच्या नेतृत्वावर सभासदांनी विश्वास दाखविला.निवडणूक निर्णय अधिकारी राजू इप्पर यांनी निकाल जाहीर करताच क्रांती पॅनल पॅनल च्या समर्थकांनी गुलाल उधळून व फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला.

क्रांती पॅनल चे विजयी उमेदवार (कंसात मते) सर्वसाधारण गट शिवानंद संधान (269 )प्रवीण पाटील (315 )गणेश संधान (270 )सुनील मातेरे (250 )बापूसाहेब पाटील (256 )एकनाथ मातेरे (289) बाळासाहेब जगताप( 251 ) तर जनसेवा पॅनलचे भाऊसाहेब पाटील (245 )ओबीसी गट प्रवीण पाटील (301) महिला राखीव सुलोचना फुकट (279) तर जनसेवा पॅनलचे मंजुळा फुकट (278 )अनुसूचित जाती जमाती रामनाथ गायकवाड (312 )भटक्या विमुक्त जाती गट संतोष शिंदे (272) निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे चिंचखेड ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com