त्रिंगलवाडी किल्ल्यावर फडकला तिरंगा

त्रिंगलवाडी किल्ल्यावर फडकला तिरंगा

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) महाराष्ट्राचे वैभव असलेल्या त्रिंगलवाडी किल्ल्यावर (Tringalwadi Fort) गडकिल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या घोटीच्या कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी ध्वजारोहण केले...

इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri) त्रिंगलवाडी किल्ल्यावर प्राचीन जैन लेणीवर फुलांची सजावट करून वय ७५ वर्ष असलेले ज्येष्ठ नागरिक प्रकाश येवलेकर (Prakash Yewlekar) यांच्या हस्ते तिरंगाचे ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली.

तसेच किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पत्र्याच्या वाडीतील प्रत्येक घरांवर तिरंगा ध्वज लावून तेथील जिल्हा परिषद शाळेतील (Zilla Parishad) विद्यार्थ्यांना वही, पुस्तके, पेन आणि खाऊचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी आदिवासी विद्यार्थी आणि आदिवासी भगिनी यांनी देशभक्ती गीतांवर ठेका धरत मोठ्या उत्साहात अमृतोत्सव स्वातंत्र्यदिन साजरा केला.

यावेळी कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, गजानन चव्हाण, बाळासाहेब आरोटे, मुख्याध्यापक सचिन कापडणीस, डॉ. महेंद्र आडोळे, भाऊराव बांगर, दिपमाला सोनवणे, काळू भोर, अशोक हेमके, प्रवीण भटाटे, गणेश काळे, गोकुळ चव्हाण, सुरेश चव्हाण, ज्ञानेश्वर मांडे, महावितरणचे अभियंते राहुल जोशी, सुनील साळुंके, रोहिदास जाखेरे, हरिश्चंद्र भले, सोमनाथ भगत, उमेश दिवाकर, पूजा मांडे, तन्वी येवलेकर, सरपंच देवराम पिंगळे, दिनेश पिंगळे, केरु पिंगळे उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com