पाच वर्षीय कायरा बुरडची गिनीज बुकमध्ये नोंद

पाच वर्षीय कायरा बुरडची गिनीज बुकमध्ये नोंद

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पाच वर्षाची स्केटींगपटू कायरा मयुर बुरड़ (Five-year-old skater Kayra Mayur Burd) हिने बेळगाव येथे स्केटिंगमध्ये लॉन्गेस्ट सेंटेंस फॉर्मेशन (Longest sentence formation in skating) प्रकारात सलग 96 तास स्केटींग करीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉड्समध्ये (Guinness Book of World Records) नोंद केली आहे.

त्याचबरोबर तीची इंडोनिेशिया येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय रोलर चॅम्पीयनशिपसाठी निवड झाली आहे.यात ती देशाच्या संघाचे नेतृत्व करणार आहे.

गोवा येथे झालेल्या ’गोवा स्केटिंग फेस्टिवल’ ( Goa Sketing Festival )या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये 6 वयोगटात शॉर्ट रेस आणि लॉन्ग रेस मध्ये 2 सुवर्ण पदकाची कमाई केली आहे .

कायरा हीने 7 महिन्याच्या कालावधी मध्ये 2 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, 3 ग्लोबल रेकॉर्ड्स, एकुण 32 मेडल्स मिळवले आहेत.

त्यामध्ये 11 सुवर्ण , 8 रौप्य, 7 कान्स आणि 6 इतर पदके मिळवले आहेत. यात राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तर पदकांचा समावेश आहे. तिला प्रशिक्षक विजयमल यांचे मार्गदर्शन लाभले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com