धक्कादायक! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू

धक्कादायक! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू

नाशिक | Nashik

शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्यांनी उछाद मांडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्यातच ग्रामीण भागात दोन ते तीन दिवसाआड बिबटे आढळत असून लहान मुलांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. यामध्ये काही चिमुकल्यांना आपले प्राणही गमवावे लागत आहेत.

बिबट्यांच्या हल्ल्याच्या या घटना ताज्या असतानाच आता दुसरीकडे ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचे हल्ले वाढल्याचे दिसत असून त्यात लहान मुलांना आपले प्राण गमवावा लागला आहे. अशीच एक घटना चांदवड तालुक्यातील (Chandwad taluka) निमोण गावात (Nimon village) घडली असून मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू (Death) झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेजल सोमनाथ जाधव (वय ५) असे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव असून सदर मुलगी आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास शौचास गेली होती. मात्र बराच वेळ झाल्याने मुलगी (Girl) घरी न परतल्याने कुटुंबातील व्यक्ती शोधण्यास गेले असता त्यांना ती एका पडक्या जागेवर मृत अवस्थेत आढळून आली.

दरम्यान, या घटनेने संपूर्ण निमोण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून घटनास्थळाची वनपाल भाऊसाहेब सोमवंशी, वनरक्षक खंदारे, तलाठी सौरभ पिसोळकर, पोलीस पाटील हिरामण देवरे आदींनी पाहणी केली. तसेच या घटनेमुळे निमोण ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने तात्काळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com