सातपूर । Satpur

अंबडलिंक रोडवर बुधवार रात्री दुचाकी व टाटा ४०७ टेम्पो मध्ये झालेल्या अपघातात नाशिक मनपाचे कर्मचारी रोहित पवार यांचा ५ वर्षीय मुलगा प्रणय रोहित पवार हा बालक ठार झाला आहे. रोहित पवार व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

या ठिकाणी काही दिवसांपासून पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु असल्याने या ठिकाणी रस्त्या वळविण्यात आला आहे. एकेरी रस्तावर दोन ही बाजूची वाहतूक वळवण्यात आली होती मात्र या बाबतीत ठेकेदाराने सूचना फलक अथवा रिफ्लेक्टर न लावल्याने टेम्पोने भरधाव वेगाने चालवत दुचाकी ला धडक दिली.

मनपा कर्मचारी रोहित पवार रात्री साडे दहा वाजेच्या दरम्यान आपल्या दुचाकीवरून अंबड लिंक रोडने पाटील पार्क येथे जात असताना विरुद्ध बाजूने भरधाव येणाऱ्या टेम्पो ने जोरडार धडक दिली. यात मुलगा प्रणय पवार याचा मृत्यू झाला आहे. तर रोहित पवार व पत्नी गंभीर जखमी झाले आहे.

नागरिकांनी संबंधित ठेकेदार वर गुन्हा दाखल करून संबंधित कुटुंबास नुकसान भरपाई देण्यासाठी अर्धा तास रस्ता रोको करण्यात आला. यामुळे गुरुवारी दुपारी पपया नर्सरी ते दत्त मंदिर रस्ता अर्धा तास बंद होता.

यावेळी सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते, सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे, सा.पोलीस निरीक्षक हेमंत नागरे आदीनी नागरीकांची समजूत काढली.