कुटुंबीय झोपेत असतांना काळाचा घाला!

भिंत कोसळून पाच वर्षीय मुलाचा मृत्यू देवळा तालुक्यातील घटना
कुटुंबीय झोपेत असतांना काळाचा घाला!

नाशिक | Nashik

कुटुंबीय झोपेत असतांना रात्री बारा वाजेच्या सुमारास अचानक घराची भिंत कोसळले (Wall Collasped) . क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. या घटनेत पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू (Child Death) झाला.

देवळा तालुक्यातील (Deokar Taluka) सावकी येथील आदिवासी वस्तीवर (Tribal Vasti) ही घटना घडली. या वस्तीवर पठाण कचरू सोनवणे हे आपल्या कुटुंबासमवेत मातीच्या घरात राहतात. दरम्यान गुरुवारी रात्री गाढ झोपेत असताना अचानक घराची भिंत कोसळली (Wall Collapsed). यावेळी त्यांची पत्नी सुनीता सोनवणेव मुलगा आकाश सोनवणे मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले.

आरडाओरड झाल्याने स्थानिक नागरीकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दबलेल्यांना बाहेर काढले. यामध्ये तिघांना गंभीर (Major Injury) इजा असल्याने त्यांना उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेत मुलगा आकाश सोनवणे चा मृत्यू झाला.

सुनीता सोनवणे व दुसरा मुलगा कुणाल सोनवणे हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com