एपिरॉक मायनिंग इंडिया कंपनीकडून जिल्हा रुग्णालयास पाच व्हेंटिलेटर्स

एपिरॉक मायनिंग इंडिया कंपनीकडून जिल्हा रुग्णालयास पाच व्हेंटिलेटर्स

सातपूर | Satpur

महामारीच्या काळात जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय क्षेत्राचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवेला मदत देण्याच्या उद्देशाने एपिरॉक मायनिंग इंडिया कंपनीच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालयाला पाच व्हेंटिलेटर्स सुपूर्द करण्यात आले.

जिल्हा रुग्णालय नाशिकमधील गोरगरिबांना सेवासुविधांचा देणारी मुख्य स्थान मानले जाते. याठिकाणी कोविड- १९ सह इतर सर्व आजारांवर मोफत उपचार केले जातात.

व्हेंटिलेटर्समुळे अतिदक्षता विभागातील रुग्णांची देखभालीची गरज पूर्ण होणार आहे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना याचा मोठा लाभ मिळणार आहे.

यासोबत एपिरोक कंपनीच्या वतीने सर्जिकल मास्क, सॅनिटायझरची भेट देण्यात आले. समाजाच्या सेवेसाठी अथक प्रयत्नशील असलेल्या रुग्णालय कर्मचाऱ्यांना मदत होईल. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी हा समन्वय घडवून आणण्यात खूप मोठे साहाय्य केले.

कंपनीचे मुख्य व्यवस्थापक अरविंद पाटील यांनी शिक्षण, पिण्यासाठी शुद्ध पाणी, हरित सौरऊर्जा यासाठी कंपनी नेहमीच मदत करीत असल्याचे सांगितले.यावेळी कंपनीच्या वतीने अनिरुद्ध माहुली, ललित देशमुख, गिरीश नागमोती, संजय भुसे, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com