MHT CET 2021 : पाच हजार विद्यार्थ्यांची दांडी; मिळणार दुसरी संधी

२७ हजार ४८६ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
MHT CET 2021 : पाच हजार विद्यार्थ्यांची दांडी; मिळणार दुसरी संधी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्य सामायिक परीक्षा कक्ष (State Common Entrance Test Cell) यांच्या मार्फत अभियांत्रिकी (Engineering), औषधनिर्माणशास्त्र (Pharmacology) व कृषी तंत्रज्ञानसाठी (Agricultural technology) घेण्यात येणारी सीईटी २०२१ (CET 2021) परीक्षा नाशिक जिल्ह्यातील एकूण १३ केंद्रांवर पार पडली...

पीसीएम (PCM) व पीसीबी (PCB) दोन्ही ग्रुप मिळून परिक्षेसाठी एकूण ३२ हजार ५५८ विद्यार्थ्यांपैकी २७ हजार ४८६ हजर राहिले तर उर्वरित ५ हजार ७२ विद्यार्थी गैरहजर होते.

सकाळ व दुपार अशा दोन सत्रात दि.२० ते २५ सप्टेंबर पीसीएम तर दि. २५ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर पीसीबी ग्रुपसाठी टप्प्याटप्प्याने परीक्षा घेण्यात आली. पहिल्या पीसीएम ग्रुपच्या टप्प्यात १४ हजार ६६० (८७ टक्के) विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

तर २ हजार १२८ विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरवली. तसेच दुसऱ्या पीसीबी ग्रुपच्या टप्प्यात १२ हजार ८२६ (८१ टक्के) विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. तर २ हजार ९४४ विद्यार्थ्यांनी दांडी मारली.

दरम्यान दि. २० सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर या कालावधीत जे उमेदवार प्रवेश पत्र डाऊनलोड करुनही परीक्षेस बसू शकले नाहीत अथवा तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा पूर्ण करु शकले नाहीत, अशा उमेदवारांनी ई-मेलद्वारे, कार्यालयीन दुरध्वनी केंद्रप्रमुखांना विनंती करून आणि स्वतः सीईटी कक्षात येवून परीक्षेसाठी बसण्यास अंतिम संधी देण्यात यावी अशी विनंती केली होती.

MHT CET 2021 : पाच हजार विद्यार्थ्यांची दांडी; मिळणार दुसरी संधी
CET चे नवीन वेळापत्रक जाहीर, या तारखेला निकाल

त्यानुसार उमेदवारांचे शैक्षणिक हित लक्षात घेता पीसीएम व पीसीबी या दोन्ही ग्रुपच्या उमेदवारांची दि. ९ व १० ऑक्टोबरला अतिरिक्त सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे.

याशिवाय उच्च शिक्षण विभागांतर्गत विविध अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षा दि. ४ ते ८ ऑक्टोबर या कालावधील घेण्यात येणार आहेत. परीक्षेदरम्यान अतिवृष्टीमुळे अडचणी निर्माण झाल्यास त्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येईल. याविषयी सूचना व वेळापत्रक नव्याने प्रसिध्द करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.mahacet.org या संकेतस्थळावर भेट द्यावी, अशी सूचना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त चिंतामणी जोशी (Chintamani Joshi) यांनी दिली आहे.

परीक्षेच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षा केंद्राबाबतची सर्व माहिती तपासून व खात्री करून घ्यावी अशी सूचना जिल्हा संपर्क अधिकारी सचिन पडवळ (Sachin Padwal) यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.