ऑनलाईन मुलाखतीद्वारे ५ विद्यार्थ्यांना मिळाली नोकरी
नाशिक

ऑनलाईन मुलाखतीद्वारे ५ विद्यार्थ्यांना मिळाली नोकरी

'बजाज ऑटो'व्दारे विद्यार्थ्यांना नोकरीची संधी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या, महावीर पॉलिटेक्निकमध्ये लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी बजाज ऑटो लिमिटेड या देश तसेच विदेश पातळीवर व्यापाराचे जाळे विस्तारीकरण करणाऱ्या कंपनीच्या ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखती झाल्या होत्या.

सध्या तृतीय वर्ष मेकेनिकल इंजिनीअरिंग मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बजाज ऑटोचा कॅम्पस आयोजित करण्यात आला होता. त्यात मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या ओम खैरनार, तेजस सोनवणे, स्नेहा मोहिते, ऋतिक शिंदे, अमोल हिरे या विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षेद्वारे प्रथम स्तरावर निवड करण्यात आली होती.

तदनंतर सदर विद्यार्थ्यांची नियुक्ती बजाज ऑटोच्या प्लांट साठी निवड पत्रे महाविद्यालयाला प्राप्त झाले आहे अशी माहिती श्री महावीर पॉलिटेक्निकचे प्राचार्य, श्री. संभाजी सगरे यांनी कळविले आहे.

सध्या बजाज ऑटो ही भारतातील दुचाकी व तीनचाकी वाहन निर्मिती करणारी अग्रगण्य उद्योगसमूह असून सदर कंपनी दुचाकी व तीनचाकी वाहन निर्यातीत अग्रेसर आहे पुण्यातील चाकण आणि आकुर्डी तसेच औरंगाबाद येथील वाळूंज उत्तराखंड मधील पंतनगर येथे कंपनीचे प्लांट आहेत.

कंपनी कॅम्पसव्दारे आपले कुशल कामगार निवडीसाठी ग्राहकाभिमुख , कामाच्या पहिल्याच दिवशी जबाबदारी तत्परतेने पार पडणारे , स्वयंस्पुर्थीने काम करण्याची क्षमता असणारे , नवीन कल्पना नवीन विचार प्रवाह निर्मितीक्षमता असणार्याच विद्यार्थ्यांची निवड केली जाते असे कंपनी अधिकाऱ्यांकडून यावेळी सांगण्यात आले.

"शिक्षण गुणवत्ता स्तर आणि उद्योगाभिमुख शिक्षणप्रणाली या बळावर ‘महावीर’च्या विद्यार्थ्यांचा निवडीत अधिक समावेश होत आहे" असे यावेळी श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिष संघवी यावेळी बोलताना म्हटले आहे.

निवडलेल्या विद्यार्थ्यांचे कार्यकारी अध्यक्ष राहुल संघवी, सोसायटीच्या समन्वयिका तसेच महावीर पॉलिटेक्निकच्या डीन डॉ. प्रियंका झंवर, महावीर पॉलिटेक्निकचे प्राचार्य, संभाजी सगरे, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना निकाल लागल्यावर त्वरित विद्यार्थ्यांना नोकरीत रुजू व्हायचे आहे.

Deshdoot
www.deshdoot.com