
इगतपुरी । प्रतिनिधी | Igatpuri
येथील नाशिक-मुंबई महामार्गावरील (Nashik-Mumbai Highway) नवीन कसारा घाटात आज रविवार (दि.०८ ऑक्टोबर) रोजी सायंकाळच्या सुमारास बससह अन्य तीन वाहनांचा अपघात (Three Vehicle Accident) झाला असून या अपघातात ५ जण जखमी (Injured) झाले आहेत...
याबाबत अधिक माहिती अशी की, कसारा घाटात ( Kasara Ghat) एका काळी-पिवळी इको गाडीस ट्रकने धडक देऊन अपघात झाला होता. त्या अपघातातील प्रवासी (Passengers) उतरून सुरक्षित ठिकाणी पोहचत असतानाच ट्रकला मागून शिवशाही बसने धडक दिली. त्यामुळे बसच्या मागे असलेला ट्रेलर ट्रक आणि बसवर जाऊन आदळला.
या विचित्र अपघातात इको गाडीसह बसचे (Bus) मोठे नुकसान झाले असून शिवशाई बसला पुढील व मागील बाजूस धडक बसल्याने बसने पेट घेतला होता. परंतु, बसमधील सर्व प्रवासी खाली उतरल्याने ते थोडक्यात बचावले. या विचित्र अपघातामुळे कसारा घाटात वाहनांच्या (Vehicles) लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, पोलीसांनी अपघातग्रस्त वाहने तातडीने बाजुला केल्याने वाहतुक सुरळीत झाली.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) टीमचे सदस्य शाम धुमाळ, दत्ता वाताडे, शरद काळे, देवा वाघ यांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य केले. तसेच बस चालकाच्या मदतीने आग तात्काळ विझवण्यात यश आले. या अपघातात दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य, महामार्ग सुरक्षा पोलीस, कसारा पोलीस यांनी घटनास्थळी दाखल होत मदतकार्य केले.