रिक्षा - डंपर अपघातात पाच जणांचा मृत्यू

रिक्षा - डंपर अपघातात पाच जणांचा मृत्यू

लासलगाव । दि.25 वार्ताहर

विंचूर- लासलगाव रस्त्यावर (Vinchur-Lasalgaon road) मंजुळा पॅलेसजवळ आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान रिक्षा (Auto Rickshaw) व डंपर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात (Accident) रिक्षाचालकासह चार प्रवासी असे पाच जण ठार झाले.या अपघातात चार जण जागीच ठार झाले तर अत्यवस्थ असलेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू (Death during treatment) झाला.

सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान लासलगावकडून (Lasalgaon) प्रवासी भरलेली रिक्षा (एम एच 15 वाय 4461) विंचूरच्या दिशेने येत असतांना.विंचूरकडून लासलगावच्या दिशेने जात असलेला डंपर (एम.एच.06 झेड 7576) यांच्यात भीषण अपघात होवून

रिक्षाचालक सुहास मनोहर निकाळे (40) रा.विंचूर तसेच प्रवासी विठ्ठल बाजीराव भापकर (65, रा.लोणी ,ता.राहाता), बाळासाहेब बालाजी नांगरे (60, रा.प्रवरा कॉलनी),रतन सुकदेव गांगुर्डे (40,रा.विंचूर), किसन गोविंददास बैरागी (60,रा. धारणगाव खडक) हे ठार झाले. मृतांना लासलगाव ग्रामिण रुग्णालयात (Lasalgaon Rural Hospital) दाखल करण्यात आले. घटनास्थळी लासलगाव पोलिसांनी धाव घेत डंपर चालकास ताब्यात घेतले.

Related Stories

No stories found.