Video : खुनाचा कट उधळला; पाच संशयितांच्या आवळल्या मुसक्या

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

एका व्यक्तीच्या खुनाचा (Murder) कट रचत असल्याची गोपनीय माहिती अंबड पोलिसांना (Ambad Police) मिळताच एका तडीपारासह चार जणांना पोलिसांनी सापळा रचून अटक (Arrested) केल्याची घटना आयटीआय पुलानजीक घडली...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही संशयित आयटीआय पुलाजवळ एका व्यक्तीच्या खुनाचा कट रचत असल्याची गोपनीय माहिती अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे सपोनि गणेश शिंदे (Ganesh Shinde) यांना मिळाली.

यावरून वपोनी कुमार चौधरी, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी गणेश शिंदे, पोलीस नाईक किरण गायकवाड, हेमंत आहेर, राकेश राऊत, अनिरुद्ध येवले, नितीन सानप, मुकेश गांगुर्डे, मुरली जाधव, योगेश शिरसाठ आदींच्या पथकाने सापळा रचला.

संशयितांना पोलीस आल्याची चाहूल लागताच त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने संशयितांचा पाठलाग करत भद्रकाली पोलिसांच्या कारवाईत नाशिक जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार असलेला निखिल उर्फ निकु अनिल बेग (23, रा. द्वारका) यासह पोलिसांच्या रेकॉर्डवरील विशाल संजय अडागळे (२४, इंदिरा गांधी वसाहत, लेखानगर), साहिल उर्फ सनी शरद गायकवाड (२३, रा. पंचवटी)

यांसह ज्ञानेश्वर उर्फ निलेश कारभारी लोहकरे (25, रा. राणाप्रताप चौक ) रोशन संजय सूर्यवंशी (19, राणाप्रताप चौक) यांना पोलिसांनी अटक केली. संशयितांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता यांच्यातील एका जणाच्या पत्नीसोबत एका व्यक्तीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याला मारण्याकरिता त्यांनी गावठी कट्टा आणला होता.

पोलिसांनी संशयितांकडून गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुस व तिन कोयते हस्तगत केले. याप्रकरणी पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी गणेश शिंदे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com