इगतपुरी रेव्ह पार्टीतील 'या' तीन जणांना मिळाला  जामीन

इगतपुरी रेव्ह पार्टीतील 'या' तीन जणांना मिळाला जामीन

तेवीस जणांना सात दिवसाची न्यायालयीन कोठडी

इगतपुरी । Igatpuri

रेव्ह पार्टीतील (Igatpuri Rave Party) २५ संशयितांपैकी इगतपुरी न्यायालयाने (Igatpuri Court) तीन जणांचा जामीन मंजुर (Bail granted) करत उर्वरीत २३ संशयितांचा जामीन न्यायालयाने आज पुन्हा फेटाळत ७ दिवसाची न्यायालयीन कोठडी (Court Room) सुनावली आहे. तसेच रेव्ह पार्टीत वापरलेले २ बंगलेही पोलीसांनी सील (Bunglow Seal) केले.

इगतपुरीत झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलीस (Nashik Rural Police) आणखीच आक्रमक झाले आहेत. रेव्ह पार्टीसाठी वापरले गेलेले इगतपुरीतील २ बंगलेही पोलीसांनी सील (Bunglow Seal) केले आहेत. मुंबई आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) इगतपुरीतील स्काय ताज व स्काय लगुन (Sky Taj And Sky Lagun) या अलिशान बंगल्यात चाललेल्या रेव्ह पार्टीवर ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील (Superintendent of Police Sachin Patil) यांच्या पथकाने छापा टाकुन रेव्ह पार्टी उधळुन लावली होती.

या रेव्ह पार्टी प्रकरणात अटक झालेली ‘बिग बॉस मराठी’ फेम मॉडेल अभिनेत्री हीना पांचाळ (Actress Heena Panchal) सह २५ जणांना आज पोलीस निरीक्षक समाधान नागरे व त्यांच्या पोलीस पथकाने इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती पी. पी. गिरी यांनी तीन जणांचा जामीन मंजुर करून उर्वरीत २३ जणांचा आजही जामीन नाकारत ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

या नंतर सरकारी वकील मिलींद निर्लेकर यांनी न्यायालयाकडे मागणी केली की, सर्व संशयित आरोपींनी अमली व मादक पदार्थ जवळ बाळगुन सेवन केल्या प्रकरणी व वापराबाबत अधिक तपास करण्यासाठी स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाच्या ताब्यात देण्यात यावे असा युक्तिवाद केला. सरकारी वकीलांनी केलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने यातील बंगले संभाळणारे राजु मगरे व भगवान माळी या २ जनांना सेंट्रल जेलला पाठवण्यात आले. तर यातील संदीप भोसले, सुशांत सांवत, राकेश कांगणे यांना जामीन देण्यात आला. तर उर्वरीत आरोपींना एका दिवसाच्या तपासासाठी स्थानीक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले.

नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्रामीण पोलीसांकडून २ बंगले सील करुन कारवाई करण्यात आली आहे. आठवड्याभरापूर्वी शनिवार २६ जून मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास नाशिक पोलिसांनी इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी हीना पांचाळसह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर यांनाही अटक करण्यात आली होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com