नाशिकरोडला सव्वापाच लाखांची घरफोडी

नाशिकरोडला सव्वापाच लाखांची घरफोडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बंद घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून चोरट्यांनी बेडरूममधील लाकडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिणे व रोकड असा ५ लाख २३ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरल्याची घटना नाशिकरोड येथील चेहडी पंपिंग स्टेशन परिसरात घडली आहे...

याप्रकरणी जया सुरेश भोईर (रा. निवारा दर्शन रो हाऊस, चेहडी पंपिंग स्टेशन, नाकिशरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे.

भोईर कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी १४ ते १९ जूनदरम्यान बंद घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे गंठण, पोत, असे विविध दागिणे व रोकड असा ५ लाख २३ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक जाधव करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com