मत्सबीज
मत्सबीज
नाशिक

येवल्यात दहा पाझर तलावांमध्येे पाच लाख मत्स्यबीज

आदिवासी युवकांना रोजगार

Gokul Pawar

Gokul Pawar

येवला । Yeola

जोरदार पावसामुळे तालुक्यात पाझर तलाव भरले आहेत. त्यामुळे तालुक्यातील ममदापूर, देवदरी, कोळगाव, खरवंडी, अंगुलगाव आदी गावातील दहा पाझर तलावात तब्बल 4 लाख 80 हजार मत्स्यबीज सोडण्यात आले आहे. या मत्स्यबीजांची माध्यमातून गेल्या चार ते पाच वर्षांपासून तालुक्यातील दीडशेहून अधिक बेरोजगार युवकांना रोजगार हक्काचा रोजगार मिळत आहे.

पुर्वभागात पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांनी गेल्या 5 वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून उपक्रम हाती घेतला आहे. तालुक्यातल्या आदिवासी बांधवांच्या या उपक्रमाला तरुण प्रतिसाद देत असल्याने व पाणीही चांगले असल्याने बीज सोडण्यात आले. पूर्वभागातील आदिवासी बांधवांकडून हे बीज हैदराबाद येथून उपलब्ध केले असून गायकवाड यांच्या हस्ते देवदरी येथे मत्स्यबीज सोडण्यात आले. प्रत्येक वर्षी पाझर तलाव मध्ये मत्स्यबीज टाकण्यात येते. पाच वर्षापासून आदिवासी बांधव वीटभट्टी किंवा ऊस तोडीसाठी बाहेर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत होते. मात्र आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबण्यासाठी गायकवाड यांनी पावले उचलली अन मत्सबीज उपक्रमामुळे अनेक कुटुंबाला रोजगार मिळाला असून मुलांचे शिक्षण गावातच होऊ लागले आहे.

या व्यवसायात अधिकाधिक तरुण सहभागी होऊन आपला व्यवसाय वाढवण्यासाठी काम करत आहे. मच्छी व्यवसायामुळे त्यांना स्थानिक रोजगार मिळाला झाला आहे. ग्रामीण भागातली हे तरुण आता मासे पकडण्यापासून ते विक्रीपर्यंत सहभाग घेत असल्याने अनेक कुटुंबाचा आर्थिक फायदा झाला आहे. विशेष म्हणजे तालुक्यात ताजा मासा मिळाल्यामुळे मागणी पण दरवर्षी चांगल्या प्रकारे वाढत आहे. यावर्षी तर विक्रमी बीज सोडल्याने या बांधवांना चांगला रोजगार प्राप्त होणार आहेत. बीज सोडण्याप्रंसगी खरवंडीचे सरपंच दशरथ मोरे, पोलीस पाटील भास्कर दाणे, ज्ञानेश्वर मोरे, बहिरू मोरे, विठ्ठल हंबरे, भाऊसाहेब गोदावरे, बाळू मोरे, विष्णू मोरे आदी उपस्थित होते.

आदिवासी बांधवाबरोबर इतरांनी मत्स्यव्यवसाय केल्यास चांगल्या पद्धतीने फायदा मिळू शकतो. तालुक्यामध्ये मोठे संख्येत शेततळे आहेत. शेततळ्यात सुद्धा शेतकरी बांधव आपल्या जमिनीला जोडधंदा म्हणून मच्छी व्यवसाय करू शकतात. यामुळे शेतकर्‍यांना शेततळ्यात होणारी घाण शेवाळ हे सर्व माशांचे खाद्य असल्यामुळे शेततळ्यात होणारे घाण रोखून शेतकर्‍याला दुहेरी फायदा होईल.

प्रवीण गायकवाड, सभापती, पं. स. येवला

Deshdoot
www.deshdoot.com