नाशिकहून पाचशे शिवसैनिक मुंबईकडे रवाना

नाशिकहून पाचशे शिवसैनिक मुंबईकडे रवाना

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आज शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या साडेतीन मंत्र्यांच्या बाबत गौप्यस्फोट करणार आहेत. यापार्श्वभूमीवर खासदार राऊत यांना पाठींबा देण्यासाठी नाशिकमधून मोठ्या संख्येने शिवसैनिक रवाना झाले आहेत....

नाशिकमधून शिवसैनिकांचा ताफा निघाल्यानंतर घोटी, इगतपुरी परिसरात ताफ्यातील शिवसैनिकांचे स्वागत करण्यात आले.

संजय राऊत यांची पत्रकार परिषद आज चार वाजता होणार आहे. या पार्श्वभूमीवरखासदार राऊत यांना पाठबळ देण्यासाठी नाशिकमधून शेकडो कार्यकर्ते सकाळी मुंबईकडे रवाना झाले.

शिवसेना नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसारम, सुमारे चारशे ते पाचशे शिवसेना सैनिकांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला.

घोटीसह जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी फुलांच्या पाकळ्या उधळत घोषणाबाजी केली शिवसैनिकांनी शिवसेनेच्या नावाचे टी-शर्ट घालून सहभाग घेतला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com