तुमच्या साथीला आम्ही अहो ना बाबा !

तुमच्या साथीला आम्ही अहो ना बाबा !

नाशिक विभागात पाचशे शेतकर्‍यानी संपविले जीवन, दीड वर्षातील आकडेवारी

नाशिक | Nashik

नापीकी (Barrenness) रोगराई, शेतातून हवे तसे उत्पन्न मिळत नसल्याने यातुन आर्थिक संकट ( Economic crisis) राहत असल्याने व इतर कारणांमुळे नाशिक जिल्हयासह (Nashik District) विभागातील तब्बल ५०२ शेतकऱ्यांनी जीवन (Farmers Suicide) संपविल्याचे चित्र आहेे.

२०२१ चालू वर्षात जानेवारी ते जून (January to June) दरम्यान १५१ व्यक्तींनी आत्महत्या केल्या. तर २०२० मध्ये ३५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून १२९ व्यक्तीच शासनाच्या मदतीसाठी पात्र ठरले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्याचे प्रमाण कमी असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. मात्र सततच्या अस्मानी संकटामुळे (Rainy crisi शेतकरी या ना त्या कारणाने आर्थिक संकटात येत आहे. यामुळे हताश झालेल्या शेतकरी बांधवाकडून टोकाचे पाउल उचलून गळफास घेत व विषारी औषध (Poisoning) घेउन जीवन संपविले जात असल्याचे समोर येत आहे.

चालू वर्षात आत्महत्या केलेल्यापैकी ४५ शेतकरी कुटूंब शासकीय मद्तीसाठी पात्र (Eligible for government assistance) ठरले आहे तर ३६ जणांचे अहवाल अपात्र ठरविण्यात आले. ७० जणांचे अहवाल प्रलंबित आहे. पात्र शेतकर्‍यांना एक लाखाची मद्त केली जाते. २०२० वर्षामध्ये नाशिक विभागात एकुण ३५१ शेतकरी बांधवांनी आयुष्य संपविले, यात नाशिक ४४, धुळे ६५, नंदूरबार १०, जळगांव १३१, नगर ९१ शेतकरी आत्महत्या केल्या.

शेतकरी आत्महत्या रोखण्याकरिता शासनाकडून विविध योजनांची अंमलबजावणी (Schemes Implement) करण्यात आल्या आहेत. मात्र तरीही शेतकरी वर्गाकडून आत्महत्यासारखे टोकाचे पाउल उचलले जात आहे, यासाठी शासनाकडून गाव पातळीवर ठोस उपाययोजणा करण्याची गरज आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com