सिन्नरमधील पाच हॉस्पिटलला कोविड सेंटरचा दर्जा

या हॉस्पिटलचा समावेश
सिन्नरमधील पाच हॉस्पिटलला कोविड सेंटरचा दर्जा
कोविड सेंटर

सिन्नर । Sinnar

तालुक्यातील ५ खासगी हॉस्पिटला कोविड सेंटरचा दर्जा मिळाला असून आता सिन्नर तालुक्यात एकूण सात कोविड सेंटर झाले आहे.

खासगी रुग्णालयांना अधिकृत कोविड सेंटरचा दर्जा मिळाल्याने शासन नियमानुसार या हॉस्पिटलमध्येच रेमडिसिव्हर इंजेक्शन उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी आ. माणिकराव कोकाटे यांनी प्रयत्न केले होते.

राज्यात करोनाचा प्रचंड प्रमाणात उद्रेक होत आहे. सिन्नरलाही दोन्ही औद्योगिक वसाहती व नाशिक शहर जवळ असल्याने मोठ्या प्रमाणावर करोनाचे रुग्ण वाढत आहे. सरकारी व खासगी हॉस्पिटल फुल्ल झाले आहेत. बेड मिळण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहे. बेड मिळाले तरी रेमडिसिव्हर इंजेक्शन मेडिकल स्टोर्स मधून आणावे लागत होते.

त्यामुळे अधिकृत कोविड रुग्णालयातच रेमडिसिव्हर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण ठरल्याने आ. कोकाटे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना तालुक्यातील खासगी रुग्णालयांना अधिकृत कोविड सेंटरचा दर्जा देण्याची विनंती केली होती. त्याचप्रमाणे सिव्हिल सर्जन डॉ. थोरात, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याशीही आमदार कोकाटे यांनी संपर्क करून सुचविलेल्या हॉस्पिटलमध्ये सोमवार पासून अधिकृतपणे कोविड सेंटर सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सिन्नर शहरात 4 व ग्रामीण भागात 1 नवीन कोविड सेंटर मंजूर झाले आहेत.

अशी असेल व्यवस्था...

सिन्नर शहरातील खासगी हॉस्पिटलला आता अधिकृत कोविड रुग्णालयाचा दर्जा मिळाला आहे. यात परमसाई हॉस्पिटल, मातोश्री हॉस्पिटल, शिवाई हॉस्पिटल व नांदूर शिंगोटे येथील डॉ.शरद सांगळे यांचे जनरल हॉस्पिटलचा समावेश आहे.

रेमडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा भासू नये म्हणून शासनाने ही इंजेक्शने मेडिकल स्टोर्स मधून देण्याऐवजी अधिकृत कोविड रुग्णालयामध्येच उपलब्ध करण्याचा निर्णय घेतल्याने आता पूर्वीच्या व नव्याने मंजुरी मिळालेल्या अशा 7 कोविड सेंटर मधून रेमडिसिव्हर इंजेक्शने त्या ठिकाणी दाखल असलेल्या रुग्णांना उपलबद्ध होणार आहे.

उपजिल्हा रुग्णालयातील सुविधा वाढविण्याबरोबरच खासगी कोविड रुग्णालयांनाही आ. कोकाटे यांच्या प्रयत्नांतून अधिकृत कोविड सेंटरचा दर्जा मिळाल्याने या ठिकाणी पुरेशा सुविधा व औषधोपचार मिळणार आहे.

त्याचप्रमाणे खासगी हॉस्पिटलमध्ये पुरेसा स्टाफ असल्याने ही हॉस्पिटलही पुरेशा क्षमतेने सुरू राहतील.

-डॉ. वर्षा लहाडे, उपजिल्हा रुग्णालय, सिन्नर

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com