पाच ग्रॅम सोन्याची पोत केली परत

पाच ग्रॅम सोन्याची पोत केली परत

पंचाळे । Panchale

रस्त्यावर सापडलेली ५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत प्रामाणिकपणे मूळ मालकास परत करण्यात आल्याची घटना पंचाळे येथे शिवाजी चौकात रविवारी (दि.9) सायंकाळी घडली.

पंचाळे सोसायटीच्या विद्यमान व्हॉइस चेअरमन इंदुबाई चांगदेव तळेकर या गावामध्ये भाजीपाला घेण्यासाठी शिवाजी चौकात आल्या होत्या. त्यावेळी शिवाजी चौकातील सिमेंट रोडवर रस्त्यावर पडलेली सोन्याची पोत नजरेस आली. त्यांनी तात्काळ त्यांचे जावई पत्रकार प्रभाकर बेलोटे यांना याची कल्पना दिली.

बेलोटे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर अर्ध्या तासापूर्वी उभ्या असलेल्या मारुती गाडीचा शोध घेतला. त्यांच्याशी मोबाईल वरून संपर्क केला. त्यावेळी सदरची चार चाकी शिंदेवाडी येथील किरण हांडोरे यांची असल्याने समजले.

त्यांच्याबरोबर त्यांची आई होती. त्यामुळे अधिक विचारपुर केली असता सदर पोत चंद्रकला सारंगधर हांडोरे या महिलेची असल्याचे सिद्ध झाले. त्यांच्या मुलास पंचाळे येथे बोलावून घेत सुमारे 20 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत परत करण्यात आली.

हरवलेली सोन्याची पोत परत मिळाल्याने चंद्रकला हांडोरे यांनी तळेकर यांचे आभार व्यक्त केले. तळेकर यांच्या प्रामाणिक पणाचे सर्वांनी कौतुक केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com