मालेगाव सामान्य रूग्णालयास पाच ड्युरा सिलेंडर भेट

मालेगाव सामान्य रूग्णालयास पाच ड्युरा सिलेंडर भेट

मालेगाव । Malegoan

करोनाच्या संक्रमणाच्या पार्श्वभुमीवर ऑक्सीजनची कमतरता भासत असल्याने शिवसेनेच्या वतीने पाच ड्युरा ऑक्सीजन सिलेंडर सामान्य रुग्णालयास भेट देण्यात आले.

येथील सामान्य रुग्णालयात यापुर्वी पाच ड्युरा ऑक्सीजन सिलेंडर होते. त्यामुळे सिलेंडर नाशिक, औरंगाबाद येथुन भरुन आणण्यासाठी अडचण येत होती. ड्युरा ऑक्सीजन सिलेंडरची गरज विचारात घेता पाच ड्युरा ऑक्सीजन सिलेंडर मालेगांव शिवसेनेच्यावतीने सामान्य रुग्णालयास भेट देण्यात आले. सदर सिलेंडर हे अमेरिका बनावटीचे असुन चेन्नई येथील चार्ट कंपनीने त्याची आयात करुन पुरवठा केला आहे.

25 जम्बो सिलेंडर ऑक्सिजनची क्षमता 1 ड्युरा ऑक्सिीजन सिलेंडरची आहे. ड्युरा ऑक्सिजन सिलेंडरमुळे ऑक्सिजनची बचत होते. तसेच जम्बो सिलेंडरच्या ऑक्सिजन पुर्नभरण किंमतीत बचत होते. याप्रसंगी उपमहापौर निलेश आहेर, स्थायी सभापती राजाराम जाधव, उपजिल्हाप्रमुख प्रमोद शुक्ला, तालुकाप्रमुख संजय दुसाने, महानगरप्रमुख श्रीराम मिस्तरी, राजेश अलिझाड, राजेश गंगावणे, प्रमोद पाटील, अनिल पवार, खंडु उशिरे, सारंग बोरसे, वैद्यकिय अधिक्षक किशोर डांगे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com