बनावट चेक वटवत पाच कोटीचा अपहार

सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार
बनावट चेक वटवत पाच कोटीचा अपहार

नाशिक। Nashik

हैद्राबाद (Haiydarabad) येथील एका व्यक्तीचा बँक ऑफ बडोदाच्या (Bank Of Badoda) नाशिकच्या रविवार कारंजा (RK Branch) शाखेत पास झालेल्या 5 कोटींचा चेक बनावट (Fraud Check) असल्याचे उघडकीस आल्याने याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Thane) तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याप्रकरणी बँक ऑफ बडोदाचे रविवार कारंजा शाखेतील व्यवस्थापक राजेश श्रावण सोनावणे (Maneger Rajesh Sonawane) (रा. जयभवानी रोड, नाशिकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि.2) हैद्राबाद येथील बँक ऑफ बडोदा शाखेचे विभागीय व्यवस्थापक अशुतोष बजाई यांचा दुरध्वनी आला त्यांनी सांगीतले, हैद्राबाद शाखेतून कॉन्टीनेटल हॉस्पीटल (Continetal Hospital) लि. यांचा 5 कोटी रूपयांचा चेक बनावट असल्याने पास झालेल्या चेकचे ट्रान्स्फर (Check Transfer) झालेले पैसे तात्काळ थांबवण्यास सांगीतले.

पंरतु चेक पास होऊन या चेकची 5 कोटी रूपयांची रक्कम भारत सेवाश्रम संघ यांच्या खात्याव जमा झाली होती. त्यावरून 3 कोटी रूपये आरटीजीएस मार्फत मुंबईतील न्यु डिल ट्रेडिंग कंपनी, 75 लाख नाशिक महात्मागांधी रोडवरील अभय पुनमचंद खाबिया यांच्या आयडीबीआय शाखेतील खात्यावर ट्रान्सफर करण्यात आली होती.

याचा अधिकार्‍यांनी तपास केला असता स्वामी परिपुर्णनंद महाराज यांनी हा बनावट चेक स्वत आणल्याचे समोर आले होते. त्यांनी चेक पास करून घेतला. व यावरील रक्कम लगेच ट्रान्स्फर केल्याचे समोर आले. त्यानुसार हैद्राबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com