इंदिरानगरमध्ये पाच इमारती सील

परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
इंदिरानगरमध्ये पाच इमारती सील

इंदिरानगर। वार्ताहर

करोना बाधितांची संख्या जास्त असल्याने इंदिरानगर परिसरातील तब्बल पाच बिल्डींगचा समुह असलेली फॉर्चून ऐव्हेन्युव्ह या नामांकित इमारतीचा परीसर 14 दिवसांसाठी प्रशासनाच्या वतीने सिल करण्यात आला आहे. तसेच गणेश दर्शन, तारांगण सोसायटी हरिओम फेज वन इमारतीचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

नाशिककरांनी स्वयंस्फूर्तीने जनताकर्फ्यु पाळण्याचे ठरवले असतांना इंदिरानगर परिसरात तर एक नव्हे तर तब्बल पाच बिल्डींगचा समुह असलेली फॉर्चून ऐव्हेन्युव्ह या नामांकित इमारतीचा परीसर 14 दिवसांसाठी सिल करण्यात आला आहे. सदर ठिकाण कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला असून या इमारतीतील व्यक्तींना बाहेर निघण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. मनपा विभागीय अधिकारी स्वप्निल मुदलवाडक यांनी सांगितले की,या परिसरातील नागरिकांनी आपली व आपल्या अजुबाजूला राहत असलेल्या रहिवाशांची काळजी घेत वेळोवेळी प्रशासनाने दिलेल्या त्रिसुत्रांचे पालन करावयाचे आहे.

मनपाचे विभागीय अधिकारी स्वप्नील मुदलवाडकर,शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र वडाळा गाव येथील यूपीएससी अधिकारी डॉ. पावसकर , डॉ. गायकवाड यांच्या पुढाकाराने हा परिसर सील करण्यात आला. यावेळी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुपरवायझर संगीता सातपुते, आरोग्य सेविका प्रीती सूर्यवंशी, प्रियंका पटसागळे , आशा सेविका ज्योती आहिरे, गीता गुंबाडे व महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश दर्शन तारांगण सोसायटी हरिओम फेज वन या बिल्डिंग मध्ये बॅरेगेट लावून कंटेनमेंट म्हणून घोषित करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com