साडेपाच लाख गरजुंना शिवभोजन थाळीचा लाभ
नाशिक

साडेपाच लाख गरजुंना शिवभोजन थाळीचा लाभ

गरिबांना दिलासा : ५ रुपयांत थाळी

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

लॉकडाऊन व त्यानंतरच्या परिस्थितीत गोरगरीब व मजुरांसाठी शिवभोजन थाळी योजना मोठा दिलासा देणारी ठरली आहे. एप्रिल ते १२ जुलै या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ५ लाख ५० हजार २६३ गरजू, निराधारांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे.

सत्तेत येण्यापूर्वीच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरगरिबांसाठी दहा रुपयांत शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्याची योजना आणली. करोना संकटात लॉकडाऊन जारी असताना गोरगरिबांची उपासमार होऊ नये यासाठी राज्यभर योजनेचा विस्तार करण्यात आला.

लॉकडाऊन काळात थाळीला मागणी वाढलेली असताना तिची किंमत १० रुपयांवरुन ५ रुपये करून गोरगरिबांना दिलासा देण्यात आला. नाशिक जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्र सुरू असून आतापर्यंत साडेपाच लाखांवर थाळ्यांचे चार महिन्यांत वितरण झाले आहे.

राज्यात जुलै महिन्यात २० लाख ४३ हजार ८६२ जणांसह एप्रिलपासून आतापर्यंत तब्बल १ कोटी १० लाख २३ हजार ३९१ इतक्या गरजुंनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला असल्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com