
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महिलांमध्ये दिवसेदिवस लठ्ठपणा तसेच विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे महिलांना निरोगी आयुष्य जगता यावे यासाठी जितो महिला शाखा नाशिकच्या वतीने बिझनेस बे नाशिक येथे महिलांना योगाचे धडे गिरवीत त्यांना शारिरीक व मानिसक दृष्टीने अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रसिद्ध योगा प्रशिक्षक पुनम आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सहा दिवसीय योगा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे...
या प्रशिक्षण शिबिराच्या उद्दघाटन प्रसंगी महिला शाखेच्या अध्यक्षा कल्पना पाटणी, चीफ सेक्रेटरी वैशाली जैन, सहायक सेक्रेटरी सपना पहाडे, अर्चना शहा, प्रोजेक्ट डायरेक्टर दर्शना जांगडा, सहायक डायरेक्टर शिल्पा पारख, माजी अध्यक्षा वंदना ताथेड, आशा लुक्कड यांच्यासह शाखेच्या सर्व संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.
जितो महिला शाखा नाशिकच्या महिलांच्या निरोगी आयुष्यासाठी बिझनेस बे सेंटर नाशिक येथे प्रसिद्ध योगा प्रशिक्षक पुनम आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१३ ते १८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत सहा दिवसीय योगा व एक्यूप्रेशर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिरास सुरवात झाली आहे.
यात पन्नासहून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला आहे. या प्रशिक्षण शिबिरात महिलांना लठ्ठपणा कमी करण्यासाठी योग्य आहार टिप्स, योगा व एक्यूप्रेशर याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे अशी माहिती संस्थेच्या संचालिका मोनालिसा जैन यांनी दिली आहे. तसेच जास्तीत जास्त महिलांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.