लासलगाव
लासलगाव
नाशिक

प्रथमच पार्सल व्हॅनच्या माध्यमातून बांग्लादेशला कांदा रवाना

४८० मेट्रिक टन कांदा

Gokul Pawar

Gokul Pawar

लासलगाव | हारून शेख

आशिया खंडातील अग्रेसर असलेल्या कांद्याच्या बाजारपेठेतून पार्सल व्हॅनच्या माध्यमातून प्रथमच बांगलादेश साठी कांदा रवाना झाल्याची माहिती रेल्वे विभागाकडुन मिळाली आहे.

बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी वाढल्याने लासलगाव रेल्वे स्थानकातुन ४८० मेट्रिक टन कांदा बांगलादेशात निर्यातिसाठी रवाना होत आहे. पार्सल व्हेन च्या माध्यमातून प्रथमच कांदा निर्यात होत आहे. या उच्च क्षमता असलेल्या पार्सल व्हॅनमध्ये पावसाचे पाणी आत मध्ये जाऊ शकत नसल्याने कांद्याचा प्रतवारी टिकवुन राहण्यास मदत होणार आहे. यापूर्वी प्रवासी रेल्वे गाड्यांना पार्सल बोगी जोडत भाजीपाला, फळे आणि इतर मालाची वाहतूक होत असत. आता प्रथमच लासलगाव रेल्वे स्थानकातुन पार्सल व्हेनच्या माध्यमातून कांदा बांगलादेश साठी रवाना करण्यात येत आहे.

२० पार्सल व्हॅनच्या माध्यमातून ४८० मेट्रिक टन कांदा बांगलादेश मधील दर्शना येथे जाण्यासाठी मध्यरेल्वेच्या लासलगाव रेल्वे स्थानकातुन कांदा लोडींगचे काम सुरू आहे. कांदा पार्सल व्हॅन मध्ये लोड केला जात असल्याने येणाऱ्या दिवसात अशी निर्यात सुरू राहिल्यास कोसळणाऱ्या कांद्याचे भावात सुधारणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रेल्वेने शेतमाल देशात आणि देशाबाहेरपाठविण्यासाठी पार्सल व्हॅन चालवण्याचा निर्णय घेतला रेल्वेच्या या निर्णयामुळे देशातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहण्यात मोठी मदत होणार आहे रेल्वेची प्रवासी सेवा रद्द केल्यामुळे नवनवे उपाय योजना करून रेल्वे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करताना दिसत आहे.

भारतासह जगभरात करोना विषाणूने धुमाकूळ घातल्याने देशासह जागतिक बाजार पेठेत कांद्याची मागणी घटल्याने कांद्याचे बाजार भाव एक हजार रुपयांच्या आता आल्याने कांदा उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात नाफेड मार्फत केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाने ग्राहकांच्या हितासाठी ५० हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी सुरू केली आहे. मात्र कांद्याचे बाजार भावात कोणतीही मोठी वाढ झाली नाही. त्यात बांग्लादेशातून अचानक कांद्याची मागणी वाढल्याने निर्यात दारांनी पुन्हा ४५० मेट्रिक टन कांदा बांगलादेश साठी रवाना केला आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com