आधी वाहनाची बिबट्याला धडक नंतर जखमी बिबट्याकडून वनमजूरावर हल्ला

नाशिकमधील घटना
आधी वाहनाची बिबट्याला धडक नंतर जखमी बिबट्याकडून वनमजूरावर हल्ला

निफाड | प्रतिनिधी | Niphad

तालुक्यातील नाशिक औरंगाबाद रोडवरील (Nashik-Aurangabad Road) चांदोरी गावाजवळ टाकळी फाटा येथे गुरुवारी रात्री 9.30 वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याची (Leopard) मादीं गंभीर जखमी झाली....

परिसरातील ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वनविभागाला (Forest) कळवली. रात्रीच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र यातील वनमजूर विजय माळी हे जखमी बिबट्याच्या मादीजवळ जाताच या मादीने उठून त्यांच्यावर झडप घातली.

यात माळी यांच्या उजव्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले तर जखमी बिबट्याला उपचारासाठी शुक्रवारी सकाळी जुन्नर येथे हलवण्यात आले आहे.

तालुक्याच्या गोदाकाठ परिसरात सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्याने बिबट्याचे आश्रयस्थान कमी होऊ लागल्याने बिबटे मानवाच्या दृष्टीस पडू लागले आहे. यापूर्वी फक्त गोदाकाठ परिसरातच असणारा बिबट्यांचा वावर आता संपूर्ण तालुक्यात वाढला आहे.

टाकळी फाटा परिसरात दूपदरी रस्ता ओलांडत असताना वाहनाची बिबट्याच्या मादीला धडक बसल्याने यात या मादीच्या कमरेकडील भाग तसेच डोळ्याजवळ दुखापत होऊन ती रस्त्यावर पडली. वनक्षेत्रपाल अक्षय मेहेत्रे. वनरक्षक भगवान जाधव. वनमजूर विजय माळी हे घटनास्थळी दाखल झाले.

आधी वाहनाची बिबट्याला धडक नंतर जखमी बिबट्याकडून वनमजूरावर हल्ला
शिर्डीला जाणाऱ्या सायकलस्वारांना कारची जोरदार धडक; दोन जागीच ठार

यातील वनमजूर माळी हे जखमी बिबट्याच्या मादींजवळ गेले असता सदर बिबट्याच्या मादीने माळी यांच्यावर झडप घालून त्यांच्या पायाला चावा घेतल्याने त्यांना दुखापत झाली. मात्र त्याही परिस्थितीत जखमी अवस्थेतच बिबट्याच्या मादीने रस्त्यालगत असलेल्या द्राक्ष बागेत धूम ठोकली.

आधी वाहनाची बिबट्याला धडक नंतर जखमी बिबट्याकडून वनमजूरावर हल्ला
भारत जोडो यात्रेत नाशिकच्या तरुणीची जोरदार चर्चा, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा शोध घेतला. पहाटेच्या सुमारास जखमी बिबट्यास पकडण्यास वन विभागाला यश आले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जखमी बिबट्याच्या मादीला निफाडच्या वन उद्यानात आणले व शुक्रवार दि. 11 रोजी सकाळी या मादीवर उपचार करण्यासाठी तिला जुन्नर येथे हलवण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com