पहिल्याच पावसात नाशिक तुंबले; पाहा फोटो आणि व्हिडीओ

पहिल्याच पावसात नाशिक तुंबले; पाहा फोटो आणि व्हिडीओ

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात आज जोरदार पावसाने हजेरी लावली. आजच्या पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहत होते. यादरम्यान नाशिकच्या अनेक भागात पाणी तुंबल्याचे दिसून आले. यामध्ये जुन्या नाशिकमधील काही भागांचा समावेश होता. तसेच गोदावरीच्या तीरावर ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकली आहे. त्याठिकाणीदेखील सांडपाणी वरती आल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुषित पाणी नदीत मिसळल्याचे चित्र दिसून आले...

अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते. तसेच अनेक भागात ड्रेनेज साफसफाई न झाल्याने ढाप्यातून पाणी वरती आले होते. यामुळे स्थानिक व्यावसायिकांचे मोठे हाल झालेले बघावयास मिळाले.

ढाप्यातून अचानक पाणी वरती येऊ लागल्याने काही ठिकाणी पाणी तुंबले होते. यातून मार्ग काढताना लहानमोठ्या अपघातांनादेखील नाशिककरांना सामोरे जावे लागले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com