नाशिक | प्रतिनिधी

करोनामुळे तब्बल दहा महिन्यांपासून 'लॉक' असलेल्या शाळांची घंटा आज (दि.२७) खणखणली. सुट्ट्या संपल्यानंतर शाळेचा पहिला दिवस असतो अगदी तसाच दिवस आजचा होता. विद्यार्थ्यांसह शिक्षक आजच्या दिवसाची वाट बघत होते. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंच्या शाळा सुरु झाल्यानंतर आजपासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग पहिल्यांदाच भरले.

जिल्हा परिषदेच्या एकूण 3 हजार 365 शाळा आहेत. त्यापैकी इ.पाचवी ते आठवीपर्यंतच्या 2 हजार 079 शाळा असून दोन लाख 76 हजार 49 विद्यार्थी शिक्षण घेतात. या वर्गांसाठी शिकवणार्या जिल्ह्यतील एकूण 7 हजार 243 शिक्षकांची करोना चाचणीही करण्यात आली.

पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थितीच्या आधारे शाळांमध्ये चांगलीच गर्दी होईल. त्यादृष्टीने केवळ तीन शिकवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.