भगूरला पहिले कोविड केअर सेंटर सुरू

बलकवडे यांची मोफत सेवा
भगूरला पहिले कोविड केअर सेंटर सुरू

देवळाली कॅम्प । Deolali Camp

करोनाचा मुकाबला सकारात्मक विचारांनी करणे महत्वाचे असून भगूरला बलकवडे कुटुंबीयांनी सामाजिक भावनेने आपल्या जागेत कोविड केअर सेंटर उभारण्याचे केलेले कार्य कवतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी केले.

भगूर येथील स्वा.सै.न.ल.बलकवडे आंतराष्ट्रीय क्रीडा संकुलातील मुलींच्या वसतिगृहात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा व झेप भरारी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्रेरणा बलकवडे तसेच संस्थेचे सरचिटणीस ऍड. विशाल बलकवडे यांनी जिल्हा आरोग्य विभागा मार्फत कोविड बाधितांसाठी सर्वसोयी उपलब्ध करून देत ५० बेडच्या कोविड केअर सेंटरची उभारणी केली त्याचा शुभारंभप्रसंगी आव्हाड बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड.गोरखनाथ बलकवडे, तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे,विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे, जिल्हा परिषदेचे नोडल अधिकारी डॉ.कृष्णा बावस्कर, डॉ संजय जाधव, मुन्ना अन्सारी, अजिंठा काळे, चेतक बलकवडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविकातून प्रेरणा बलकवडे यानी करोना महामारीत नागरिकांची बेड अभावी होणारी अडचण लक्षात घेऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून व ऍड.गोरखनाथ बलकवडे यांच्या सहकार्यने हे सेंटर जिल्हा आरोग्य विभागाकडून मंजूर केले आहे.

ज्यात परिसरातील बाधितांचे पॉसिटीव्ह व सिटीस्कॅन रिपोर्ट तपासून प्रवेश देण्यात येणार आहे. याशिवाय येथे उपचारासाठी डॉ.पवन चौहान, डॉ. निखिल देसले यांच्यासह ६ नर्सेस कार्यरत असून प्राथमिक स्वरूपात लागणाऱ्या सर्व औषधांचा पुरवठा होणार आहे. त्याच प्रमाणे रुग्णांना विविध मनोरंजनपर खेळ व अन्य आवश्यक सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com