
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
येथील परिसरातील बाजीप्रभू चौकात (Baji Prabhu Chowk) सकाळी काही संशयितांनी सराईत राकेश कोष्टी (Rakesh Koshti) याच्यावर गोळीबार (Firing) केल्याची घटना घडली असून कोष्टी याची तब्बेत चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका सराईतास ताब्यात घेतले आहे....
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दोन खुनाच्या गुन्ह्यातील संशयित राकेश कोष्टी याच्यावर रविवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने गोळीबार करत त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. या घटनेत कोष्टी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत. तसेच त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
दरम्यान, या घटनेची माहिती समजताच उपायुक्त चंद्रकांत खांडवी (Chandrakant Khandvi) उपायुक्त प्रशांत बच्छाव आदींसह अंबड पोलिसांचा (Ambad Police) फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. याप्रकरणी पोलिसांनी जया दिवे या सराईत संशयिताला (Suspect) ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.