मालेगावात सराईताकडून गोळीबार; रिक्षाचालक बालंबाल बचावला

मालेगावात सराईताकडून गोळीबार; रिक्षाचालक बालंबाल बचावला
News Update | न्यूज अपडेटNews Update | न्यूज अपडेट

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत सराईताकडून मालेगावात एका रिक्षाचालकावर गोळीबार केल्याची घटना घडली. (Firing at kusumba road Malegaon) कुसुंबारोडवर घडलेल्या या घटनेने मालेगाव शहर दहशतीखाली आले आहे...

अश्फाक शहा मुक्तार शहा या रिक्षाचालकाने पोलीस ठाण्यात दिलेल्या (Malegaon Police Station) फिर्यादीनुसार, अश्पाक सायंकाळी प्रवाशांना घेऊन कुसुंबा रोडने जात होता. मुरली रुग्णालयाच्या पुढे आल्यानंतर संशयित सय्यद इरफान सय्यद इस्माईल उर्फ इरफान काल्या या सराईताने साथीदारांच्या सोबत रिक्षा अडवत शिवीगाळ व दमबाजी करण्यास सुरुवात केली.

पत्नीशी अश्पाकचे अनैतिक संबंध असल्याचे आरोप करत इरफान काल्‍या याने गावठी कट्ट्यातून पोटावर गोळी झाडली. सुदैवाने गोळी कमरेला लागल्याने अश्पाक शाह बालंबाल बचावला. गोळीबारात जखमी झालेल्या रिक्षा चालकअशपाक यास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी इरफान काल्या व त्याच्या साथीदारांनी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार सराईत अश्पाकसह काही साथीदार ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com