मालेगावला जमिनीच्या वादातून गोळीबार

मालेगावला जमिनीच्या वादातून गोळीबार

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

जमिनीच्या वादातून Land Dispute शहरातील म्हालदे Malegaon- Mhalde Shivar शिवारात एम आय एम चे माजी महापौर नगरसेवक अब्दुल मालिक युनुस ईसा व माजी, आ, शेख रशीद यांचे बंधू शेख खलील यांच्यात शाब्दिक चकमक होऊन दोघांचे समर्थक एकमेकांवर धावून गेले यावेळी एका शेडची नासधूस करण्यात येऊन गोळीबार fired देखील केला गेला मात्र सुदैवाने कुणी जखमी झाला नाही आज दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्यासह अधिकारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला जमिनीच्या वादातून अब्दुल मालिक व शेख खलील यांच्यात भांडण झाले आहे यावेळी गोळीबार केला गेल्याचे दोन्ही गटातर्फे सांगितले जात आहे हा गोळीबार केला याची चौकशी पोलिसांतर्फे केली जात असल्याची माहिती खांडवी यांनी दैनिक देशदूत शी बोलताना दिली.

याप्रकरणी दोन्ही गटांतर्फे परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या जात असल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई पवारवाडी पोलीस ठाण्यात pawarwadi Police stationसुरू होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com