किराणा दुकानाला आग; लाखोंची हानी

अज्ञाताकडून आग लावल्याची तक्रार
किराणा दुकानाला आग; लाखोंची हानी

डांगसौंदाणे । प्रतिनिधी Dangsoundane

बुंधाटे- कळवण रस्त्यावर डांगसौंदाणे पोलीस दुरक्षेत्रा समोर असलेल्या दुकानाला काल मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी आग लावल्याची तक्रार सटाणा पोलिसात दुकान मालक योगिता गोपालदास बैरागी यांनी दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुंधाटे चे माजी उपसरपंच नंदूदास बैरागी यांची मुलगी योगिता बैरागी यांची कळवण डांगसौंदाणे रस्त्यावर आदिवासी विकास महामंडळाच्या सोसायटी गोडाऊन जवळ किराणा व कोल्ड्रिंक्स व्यवसायाची लोखंडी टपरी आहे .याचं ठिकाणी त्यांचा रसवंती चा ही व्यवसाय आहे.

दुकानापासून बैरागी यांचे घर हे हाकेच्या अंतरावर असुन रात्री टपरीच्या मागील बाजूनं अज्ञात समाजकंटकाने या दुकानात आग लावल्याची तक्रार करण्यात आली आहे. मध्यरात्री सुमारास बुंधाटे येथील शशिकांत जगताप हे कळवण रस्त्याने बाहेरगावहून आले असता त्यांना या दुकानातून धूर बाहेर येतांना दिसल्याने त्यांनी बैरागी कुटुंबाला उठवत घटनेची माहिती दिली.

आज दुपारी सटाणा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर सटाणा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किरण पाटील यांनी आपले स्थानिक कर्मचारी उपनिरीक्षक जीभाऊ पवार, पोलीस हवालदार जयंतसिंग सोळंकी, निवृत्ती भोये, दिपक सोनवणे यांचे समावेत भेट देत जळीत दुकानाचा पंचनामा केला.

यावेळी सहा.पोलीस निरीक्षक किरण पाटील यांनी घटनेबाबद्दल स्थानिक परिसराची माहिती घेत विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे आग लागली किंवा नाही याची खातरजमा ही केली . या आगीत या दुकानातील सुमारे अडीच लाखांचा किराणा, कोल्ड्रिंक्स, व स्टेशनरी, माल सह फ्रीज, व दुकानाचे फर्निचर जळून खाक झाल्याने दुकान मालक योगिता बैरागी यांनी या प्रकरणी सखोल चौकशी होऊन आरोपी पकडण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com