कामटवाड्यात भंगार गोदामाला आग

कामटवाड्यात भंगार गोदामाला आग

नवीन नाशिक । प्रतिनिधी

कामटवाडे गाव धन्वंतरी मेडिकल समोर असलेल्या भंगार गोदामाला रात्री आठ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्यामुळे भीषण आग लागली आग विझविण्यासाठी नवीन नाशिक, सातपूर, अंबड येथील अग्नीशमन विभागाचे सहा बंब दाखल झाले होते.

आगीचे लोळ उठत असल्याने भंगार गोदामालगत असलेल्या घरांनाही आगीची झळ बसली मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आग बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला.

कामटवाडे गाव येथे नाजीम तांबोळी यांच्या मालकीचे गोडाऊन असल्याचे समजते. याठिकाणी मोठ्या प्रमाणत पेपर रद्दी, फायबरचे भंगार येथे साठवले जात असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंबड पोलिस घटनास्थळी हजर झाले होते.

भंगार गोदामालगतच छोटी-मोठी घरे असल्याने याठिकाणी आगीची झळ नागरिकांपर्यंत पोहोचली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तब्बल तासाभरानंतर आठ विझवण्यात अग्निशमन विभागाला यश आले, या आगीत एक ते दोन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com