बागवानपुरा परिसरात खानावळीला आग

अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात
बागवानपुरा परिसरात खानावळीला आग

जुने नाशिक | वार्ताहर Old Nashik

येथील बागवानपुरा Bagvanpura परिसरातील मातंगवाडा समोरील एका खानावळीला Canteen (दि.१९) सकाळी अकराच्या सुमारास अचानक आग fire लागल्याची घटना घडली. या घटनेत सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. खानावळ बंद असल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या आगीत एका किराणा दुकानासह दोन घरांचे ही नुकसान झाले आहे.

आज सकाळी सुमारे अकरा वाजता ही घटना घडल्याची माहिती परिसरातील लोकांनी दिली. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच मुख्यालयातून दोन बंब घटनास्थळी पाठविण्यात आले. ही आग भर वस्तीत लागली असल्याने अग्निशामक दलाच्या इतर केंद्रांवरून देखील अधिक बंब पाठविण्यात आले. परंतु मुख्यालयातील दोघा बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आली.

घटनास्थळावरून चार गॅस सिलेंडर काढण्यात आले असून प्रथमदर्शनी सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली आहे. ही आग बागवानपुरातील हॉटेल ख्वाजा दरबार इस्लामी खानावळ Hotel Khwaja Darbar Islamic Restaurantयाला लागली होती. ही खानावळ कामरान खान यांच्या मालकीची असल्याची माहिती मिळाली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे फायरमन राजेंद्र पवार लिडींग फायरमन शाम राऊत, वाहन चालक झेड. के. गायधनी, नाजिम शेख, अभिजीत देशमुख आदींनी परिश्रम घेतले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसल्याने या आगीची नोंद अकस्मात म्हणून करण्यात आली आहे.

या आगीमध्ये खानावळ बरोबरच शेजारील आसिफ किराणा व खानावळच्या पाठीमागील सलीम शेख व नन्हूभाई खलिफा यांच्या घरांचे देखील मोठे नुकसान झाले आहेत, असे समजते. आग विझविण्यासाठी परिसरातील युवकांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. यामध्ये प्रामुख्याने माजी नगरसेवक संजय साबळे, सामाजिक कार्यकर्ते आसिफ मुलानी, दानिश बागवान, मोहसिन फय्याज, हनीफ बशीर, साजिद मुलतानी, फारुक हूसैन, रफिक शेख, पापा खलिफा, सलीम शेख आदींचा समावेश होता.

आगीचे वृत्त पसरताच परिसरात एकच गर्दी जमली होती. यामुळे द्वारकेकडून जुने नाशकात येणारा रस्ता व अमरधाम रोड परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तसेच काल दिवसभर या परिसरातील वीज पुरवठा खंडित होता. यावेळी भद्रकाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्ता पवार व पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी घटनास्थळी जातीने उपस्थित राहून गर्दीवर नियंत्रण मिळविले तसेच पोलीसांचा फौजफाटा लावून वाहतूक कोंडी सुरळीत करून दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com