कोविडसेंटरमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना 'अग्निशमन'डून  प्रशिक्षण

कोविडसेंटरमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना 'अग्निशमन'डून प्रशिक्षण

आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी मनपा सज्ज

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्य भरातील विविध कोविड केअर सेंटर (Covid Care Center) मध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनांमुळे सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आगीच्या घटना घडू नये यासाठी नाशिक महानगरपालिकेकडून (Nashik Municipal corporation) शहरातील विविध कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयांमध्ये आपत्कालिन बचाव प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली आहे...

आत्तापर्यंत ०३ कोविड केअर सेंटरमध्ये हे प्रशिक्षण पार पडले आहे. यामध्ये मेरी कोविड केअर सेंटर, ठक्कर डोम, कोविड केअर सेंटर, व राजे संभाजी स्टेडिअम, अश्विन नगर येथील कोविड सेंटरचा समावेश आहे.

या ठिकाणी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सुरक्षारक्षक यांना अग्निनिर्वाणके (Fire extinguisher) आपत्कालिन परिस्थितीत वापरण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले.

शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने त्या दृष्टीकोनातून शहरात विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरु केले आहेत. उन्हाळयाचे दिवस असल्याने त्या ठिकाणी वातानुकूलित यंत्रणा बसविलेल्या आहेत. तसेच पंख्यांसाठी विद्युत वायरिंग केलेली आहे.

यामुळे याठिकाणी काही दुर्घटना घडल्यास त्या दृष्टीकोनातून कोविड केअर सेंटर मध्ये व रुग्णालयांमध्ये आगप्रतिबंधक उपाययोजना म्हणून ABC – TYPE व CO2 अशा प्रकारचे अग्निनिर्वाणके (Fire extinguisher) मनपा मार्फत बसविण्यात आलेले आहेत.

या प्रशिक्षणास उपस्थित वैद्यकीय कर्मचारी व सुरक्षारक्षक यांना अग्निनिर्वाणके (Fire extinguisher) वापरण्याबाबतची माहिती असणे गरजेची आहे. त्या दृष्टीकोनातून आयुक्त कैलास जाधव व अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या आदेशाने प्रशिक्षण देण्याचे काम अग्निशमन विभागाकडून सुरु केलेले आहे.

तसेच अग्निशमन विभागाकडून ठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटर, येथे रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ०१ अग्निशमन बंब कर्मचाऱ्यांसह २४ तास तैनात करण्यात आलेला आहे. आज (दि.२०) पुणे रोड येथील समाज कल्याण कोरोना कक्ष, हिरावाडी येथील स्व. मीनाताई ठाकरे स्टेडियम व डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथे हे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती अग्निशमन दल प्रमुख एस.के बैरागी यांनी दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com