वाहनांच्या शोरूमला भीषण आग

वाहनांच्या शोरूमला भीषण आग

नवीन नाशिक । प्रतिनिधी

पाथर्डी फाटा येथे असलेल्या जितेंद्र मोटर्सच्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या शोरूमला पाऊस सुरू होताच शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना घडली. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र सुमारे करोडो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पाथर्डी फाटा येथे जितेंद्र मोटर्सच्या मागील बाजूस इलेक्ट्रॉनिक्स गाड्यांचे शोरूम आहे आज दि.22 सायंकाळी 07:20 वाजेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे याठिकाणी शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी.

अचानक पणे शोरूम मधून धूर दिसू लागल्याने या ठिकाणी असलेल्या सुरक्षारक्षक आणि काही कामगारांनी स्वतःचा जीव वाचवत तातडीने अग्निशामक दलाला याबाबतची माहिती दिली.यावेळी नवीन नाशिक स्टेट बॅंक चौक ,अंबड औद्योगिक तसेच नाशिक महानगरपालिकेच्या विविध भागातील सुमारे सहा अग्निशामक दलाच्या बंबांच्या साह्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

रात्री उशिरापर्यंत ही आग विझविण्याचे काम सुरू होते. आग लागलेली असताना बाहेर पाऊसही सुरू असलेला असल्यामुळे आग विझवण्यात अडचणी येत होता मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले यावेळी आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेकांनी या ठिकाणी गर्दी केली होती .

या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी ,अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर सपोनी किशोर कोल्हे, उपनिरीक्षक राकेश शेवाळे आदींसह पोलीस सेवक घटनास्थळी दाखल झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com