सीबीएस परिसरात वडापाव दुकानाला आग

सीबीएस परिसरात वडापाव दुकानाला आग
देशदूत न्यूज अपडेट

नाशिक | Nashik

सीबीएस परिसरातील एका वडापाव दुकानास गुरुवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत तेथील ३ व बाजूच्या दुकानातील २ गॅस सिलींडर बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला.

सीबीएस येथील या वडापाव दुकानातून दुपारी दोनच्या सुमारास धूर येत होता. यामुळे नागरिकांनी याची माहिती अग्निशमन विभागास कळवली. विभागाने तातडीने घटनास्थळ गाठले. त्यांनी दुकानाचे शटर तोडून आग विझवण्यास सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीस दुकानातील तीन गॅस सिलींडर बाहेर काढले.

दुकानाची पाहणी केली असता दुकानातील इलेक्ट्रीक भट्टीला शार्टसर्कीट होऊन आग लागल्याचे स्पष्ट झाले. तसेच खबरदारी म्हणून विभागाने डोसा सेंटरमधील दोन सिलींडर दुकानाबाहेर काढले. यामुळे अनर्थ टळला. या आगीत दुकानाचे नुकसान झाले आहे.

अग्निशमन दलाचे लिडींग फायरमन इकबाल शेख, फायरमन सोमनाथ थोरात, इसाक शेख, ज्ञानेश्वर दराडे, राजेंद्र पवार, विजय शिंदे, गणेश गायधनी यांनी ही आग विझवली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com