टाकेद ग्रामपंचायत कार्यालयाला आग

टाकेद ग्रामपंचायत कार्यालयाला आग

घोटी । वार्ताहर Ghoti

सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायत कार्यालयाचा Sarvatirtha Taked Grampanchayat Office अज्ञात समाजकंटकांनी दरवाजा तोडून ग्रामपंचायत कार्यालयामधील मुख्य संगणक ऑपरेटर कक्षाला आग Fire लावली . या आगीत ग्रामपंचायत कार्यालयातील शासकीय संगणक संच, प्रिंटर, चार्जिंग बॅटरी, यांसह महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे संपूर्ण दफ्तर, जन्म-मृत्यू नोंद रजिस्टर यांसह दैनंदिन वापरात असलेल्या सामग्रीचे मोठे नुकसान झाले आहे.

ग्रामपंचायत कार्यालयातून धूराचे लोट बाहेर पडत असतांना गावातील बसचालक, वाहक व काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ही माहिती तत्काळ ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत, सदस्य यांना कळविली. यानंतर उपसरपंच रामचंद्र परदेशी, रतन बांबळे, ग्रामपंचायत सदस्य सतीश बांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व ग्रामपंचायत सेवकांमार्फत आग विझवण्यात आली.

यानंतर रतन बांबळे,उपसरपंच रामचंद्र परदेशी यांनी पोलीस पाटील प्रभाकर गायकवाड यांच्यामार्फत घटनेची माहिती घोटी पोलीस स्टेशनशी तात्काळ संपर्क करून कळवण्यात आली. यानंतर घोटी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी पहाटे चार- पाच वाजेच्या सुमारास अज्ञात समाज कंटकांनी टाकेद ग्रामपंचायत कार्यालयाच्या पश्चिम बाजूच्या दरवाजाची तोडफोड करत दरवाजा उघडून ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश केला.

यानंतर ग्रामपंचायत कार्यालयातील मुख्य संगणक कक्षातील संगणक उचलून कागदपत्रांवर ठेवून आग लावण्यात आली. व लगेचच अज्ञात व्यक्तीने घटनास्थळावरून पोबारा केला. तसेच अज्ञात व्यक्तींनी पंधरा एल ई डि बल्ब,संगणक किबोर्ड यांसह अनेक वस्तू चोरून नेल्याचे म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com