शिंदे गाव एमआयडीसीत रंग बनविण्याच्या कंपनीला आग ; लाखो रुपयांचे नुकसान

शिंदे गाव एमआयडीसीत रंग बनविण्याच्या कंपनीला आग ; लाखो रुपयांचे नुकसान

नाशिक रोड - प्रतिनिधी nashik

नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या शिंदे गाव येथील एमआयडीसी (midc) परिसरात असलेल्या रंग बनविण्याच्या तिरुपती नावाच्या कंपनीला भीषण आग लागली असून या आगीमुळे परिसरात धुराचे लोट दिसत आहे दरम्यान आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे तब्बल सहा बंब घटनास्थळी दाखल झाले आहे आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान सदरची आग कशामुळे लागली याबाबत तर्क वितर्क सुरू असले तरी सदरची आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची चर्चा परिसरात आहे दरम्यान या आगीमुळे आजूबाजूच्या कंपन्यांना धोका होण्याची शक्यता असून अग्निशामक दल त्याबाबतीत खबरदारी घेत आहे सदरच्या आजीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून इतर कंपन्या तातडीने बंद करण्यात आल्या आहे ऑइल रंग पेंट व केमिकल मुळे सदरची आग मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना आग विझविण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.

दरम्यान नाशिक रोड येथील अग्निशामक दलाचे कर्मचारी श्रीरंग आडके राजू आहेर मनोज साळवे राजेंद्र काळे राजेंद्र कर्जुले लक्ष्मीकांत बेंद्रे आधी अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे या आगीमध्ये निश्चित किती लाख रुपयाचे नुकसान झाले याबाबतचा आकडा समजू शकला नाही.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com