गंजमाळ परिसरातील मास्टर मॉलला आग

गंजमाळ परिसरातील मास्टर मॉलला आग

नाशिक । Nashik

शहरातील गंजमाळ परिसरातील (Ganjamal area) मास्टर मॉलला (Master Mall) आग (Fire) लागल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली आहे.

तसेच ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून आग विझविण्यासाठी अग्निशनम विभागाच्या (fire department) दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

आग तिसऱ्या मजल्यावर लागली आहे. साधारण सहा वाजेच्या दरम्यान रविवार असल्यामुळे बंद असलेल्या मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून दूर निघायला सुरुवात झाल्यानंतर लोकांनी त्वरित पोलिसांसह महापालिकेच्या अग्निशामक दलाला फोन केला.

महापालिकेच्या सातपूर, पंचवटी, तसेच मुख्यालयसह के के वाघ केंद्र या चार ठिकाणचे चार बंब सुमारे वीस जवानांस ह घटनास्थळी पाठविण्यात आले. अधीक्षक अग्निशामक दल राजेंद्र बैरागी यांचे नेतृत्वाखाली खोडे, लासुरे आदी आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

धूर खूप जास्त असल्यामुळे तसेच बंबला पोहोचण्यासाठी मार्ग नसल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्यप्रमाणावर अडचणी येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी उपस्थित आहे.

जीवित हानी नाही तरी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अजूनही आग आटोक्यात आली नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com