हिरावाडीत मध्यरात्री आगीचा भडका

हिरावाडीत मध्यरात्री आगीचा भडका

पंचवटी | प्रतिनिधी Panchvati

पंचवटीतील हिरावाडी परिसरात (fire at panchvati hirawadi area) असलेल्या प्लायवूडच्या दुकानास आग लागल्याने संपूर्ण दुकानातील साहित्य जळून राख झाले आहे. या घटनेत मोठे नुकसान झाले आहे...

काल (दि ३१) रात्री 11 वाजेच्या सुमारास हिरावाडी रस्त्यावरील प्रियांका प्लायवूड दुकानास आग लागली. लाकडाचे साहित्य अधिक असल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले.

आगीचे लोळ बाहेर येऊ लागल्यामुळे मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

शहरातील विविध विभागांच्या १० ते १५ अग्निशमन बंबानी (fire department) आग आटोक्यात आणल्यामुळे बाजूच्या इमारतींचा धोका टाळला.

या आगीत (Fire) एक कोटींपेक्षा अधिकचा माल जळून राख झाला आहे. शॉर्टसर्किटमुळेच आगीचा भडका आग लागली असावी असा अंदाज आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com