पंचवटी परिसरातील गौडवाडी येथील झोपड्यांना आग

संसारपयोगी साहित्य जळून खाक
पंचवटी
पंचवटी

पंचवटी | Panchavti

पंचवटीतील गौडवाडी मध्ये लागलेल्या आगीत दोन झोपड्या जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाचे जवान वेळीच दाखल झाल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी घरातील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले.

रविवारी(दि.९) दुपारी १२ वाजेच्या सुमारास गौडवाडी मधील झोपडीला आग लागली. काही क्षणात आगीने शेजारील झोपडीला देखील विळख्यात घेतले.

यावेळी परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागास माहिती दिल्याने विभागाचे लिडिंग फायरमन एस.के.कानडे, डी. आर.गाडे, फायरमन एस.एल.पाटील, पी.आर.पगारे, एन. पी.म्हस्के, एस.बी.भालेराव, जी.एस.अहिरे, आर.के.मानकर आदींनी पाण्याचा फवारा करीत आग आटोक्यात आणली.

यावेळी पंचवटी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. आगीत दोन झोपड्यामधील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. दरम्यान शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com