स्थानिक समस्यांचा शोध घेऊन उपाययोजना करा

महावितरण संचालक सावंत यांच्या अधिकार्‍यांना सूचना
स्थानिक समस्यांचा शोध घेऊन उपाययोजना करा

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

वसूलीचे प्रमाण कमी असलेल्या विभागातील स्थानिक कारणांचा व समस्यांचा शोध घेऊन महसूल वाढीच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या Find out and solve local problems सुचना महावितरणचे संचालक (वित्त), रविंद्र सावंत MSEDCL Director (Finance), Ravindra Savant यांनी दिल्या आहेत.

महावितरणच्या सर्व क्षेत्रीय व सांघिक कार्यालयातील वित्त व लेखा विभागातील अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीत बँकांतील जमा रकमेचा ताळमेळ, शासनाचे लेखा परिक्षण परिच्छेद, विविध कामांचे अंतर्गत लेखा परिक्षण, तसेच दुरुस्ती व देखभाल यांवर होणार्‍या खर्चाबाबातचा आढावा घेण्यात आला.

दुरुस्ती व देखभाल यांत मोठया प्रमाणात खर्चवाढ झाल्याचे निरिक्षण नोंदवून विभाग व परिमंडल पातळीवर या खर्चाबाबतचे लेखा परिक्षण व विशेष संनियंत्रण करण्याचे आदेश रविंद्र सावंत यांनी दिले. या कामात दिरंगाई झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असे सांगितले. सोबतच वित्त व लेखा विषयक कामकाजाचा आढावा घेऊन प्रत्यक्षात चालू असलेल्या कामाबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

बँकांमध्ये जमा होणर्‍या रकमा, प्राप्त होणारे धनादेश, बँकांकडून आकारण्यात येणारे रोख रक्कम हाताळणी शुल्क याबाबतही यावेळी चर्चा करण्यांत आली. या बैठकीला कार्यकारी संचालक (वित्त) स्वाती व्यवहारे, मुख्य महाव्यवस्थापक (अंतर्गत लेखा परिक्षण) चंद्रशेखर गद्रे, मुख्य महाव्यवस्थापक (सांघिक-वित्त) सतिश तळणीकर आणि अनिल कालेकर यांचे सोबत सांघिक व क्षेत्रीय कार्यालयातील इतर सर्व अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com